वाह रे पठ्ठ्या! २० वर्षीय मुलाने ३ हजार २०० किमी सायकल चालवून अखेर घर गाठलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 03:42 PM2020-07-03T15:42:51+5:302020-07-03T15:52:42+5:30

या विद्यार्थ्याने घरी जाण्यासाठी ३ हजार २०० किलोमीटरपर्यंतचा प्रवास सायकलवर केला आहे. 

Student cycles 2000 miles from aberdeen to athens to family home 4 | वाह रे पठ्ठ्या! २० वर्षीय मुलाने ३ हजार २०० किमी सायकल चालवून अखेर घर गाठलं

वाह रे पठ्ठ्या! २० वर्षीय मुलाने ३ हजार २०० किमी सायकल चालवून अखेर घर गाठलं

googlenewsNext

(image credit-kleon Papadimitriou)

कोरोनाच्या माहामारीने अनेकांचे आयुष्यचं बदलले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाचा प्रसार जगभरात वेगाने होत आहे. कोरोनाच्या माहामारीदरम्यान संसर्ग टाळण्यासाठी आणि लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं होतं. या कालावधीत अनेकांचे हाल झाले. जे लोक आपल्या घरापासून लांब होते. त्यांना आपल्या घरी येण्यासाठी कोणताही मार्ग नव्हता. अनेक विद्यार्थी, प्रवासी मजूर वेगवेगळ्या ठिकाणी अडकून होते. अशीच एक घटना आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. kleon Papadimitriou या विद्यार्थ्याने घरी जाण्यासाठी ३ हजार २०० किलोमीटरपर्यंतचा प्रवास सायकलवर केला आहे. 

हा विद्यार्थी स्कॉटलँडमधील युनिव्हरर्सिटी ऑफ एबरडीनमध्ये शिक्षण घेतो. जेव्हा मार्चमध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आलं तेव्हा क्लेऑनने घरी जाण्याचा विचार केला.  तब्बल ४८  दिवसांनी हा तरूण आपल्या घरी पोहोचला आहे. या तरूणाचे संपूर्ण कुटुंब ग्रीसची राजधानी एथेंसजवळ मलेशियामध्ये राहतात.

१० मे ला या तरूणाने ३० किलो वजनासह सायकलवरच्या प्रवासाला सुरूवात केली. तंबू, थोड्या फार खाण्याच्या वस्तू या मुलाने सोबत घेतल्या होत्या. जर्मनी, ऑस्ट्रीया आणि इटली असा प्रवाह करत ७ आठवड्यानी हा तरूण एथेंसला पोहोचला. रस्त्यात अनेकदा सायकल पंचर झाली. परंतू क्लोऑनने मागे न हटता पुढचा प्रवास सुरू ठेवला.

या दिवसात प्रवासादरम्यान क्लोऑने रात्री तंबूत राहून वेळ घालवला. जेवणात ब्रेड, बटर अशा पद्धतीचा आहार घेतला. हा तरूण घरी आल्यानंतर स्वागतासाठी खूप मोठा बॅनर लावल्यात आला होता. आता विमान सेवा सुरू झाल्यानंतर क्लेऑन पुन्हा आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी जाणार आहे. कोरोना काळात या तरूणाने केलेला हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.  

खरं की काय! बडवायझरचा कर्मचारी १२ वर्षे बिअर टँकमध्ये मुत्रविसर्जन करायचा? जाणून घ्या सत्य

मालकिणीचा विरह सहन न झाल्याने; इमानी कुत्रीने ४ थ्या मजल्यावरून उडी घेत संपवलं जीवन! 

Web Title: Student cycles 2000 miles from aberdeen to athens to family home 4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.