जगातली सगळ्यात महाग स्ट्रॉबेरी, एका फळाची किंमत 29 हजार रूपये; कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 16:36 IST2023-08-02T16:33:17+5:302023-08-02T16:36:08+5:30
Most Expensive strawberry : तुम्ही आंब्याच्या काही प्रजातींबाबत ऐकलं असेलच, ज्यांची किंमत लाखो रूपये किलो असते. आम्ही स्ट्रॉबेरीच्या ज्या प्रजातीबाबत सांगणार आहोत तिचं नाव आहे बिजिन हाइम.

जगातली सगळ्यात महाग स्ट्रॉबेरी, एका फळाची किंमत 29 हजार रूपये; कारण...
Most Expensive strawberry : फळं आणि भाज्या वेगवेगळ्या सीझनमध्ये स्वस्त किंवा महाग होत असतात. पण काही फळं अशी असतात ज्यांची किंमत त्यांच्या खासियतमुळे हजारो किंवा लाखो रूपये असते. अशाच एका स्ट्रॉबेरीबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या एका स्ट्रॉबेरीची किंमत 29 हजार रूपये आहे. चला जाणून घेऊ कारण....
तुम्ही आंब्याच्या काही प्रजातींबाबत ऐकलं असेलच, ज्यांची किंमत लाखो रूपये किलो असते. आम्ही स्ट्रॉबेरीच्या ज्या प्रजातीबाबत सांगणार आहोत तिचं नाव आहे बिजिन हाइम. ही स्ट्रॉबेरी शेप, टेस्ट आणि आपल्या रंगामुळे जगभरात फेमस आहे. जपानमध्ये उगवल्या जाणाऱ्या स्ट्रॉबेरीला ब्युटीफूल प्रिंसेस नाव देण्यात आलं आहे.
बिजिन हाइम नावाच्या या स्ट्रॉबेरीला मिकियो ओकुदा नावाच्या जपानी शेतकऱ्याने विकसित केलं. 45 वर्ष त्याने केवळ स्ट्रॉबेरीचीच लागवड केली. 15 वर्ष रिसर्चनंतर त्याने बिजिन हाइम नावाची ही प्रजाती विकसित केली. ही जगातली सगळ्यात महागडी स्ट्रॉबेरी आहे. याचं सगळ्यात मोठं फळ 100 ग्रामचं असू शकतं.
या खास स्ट्रॉबेरीचा सुंदर लाल रंग आणि चमकदार टेक्स्चर बघूनच ती खाण्याची ईच्छा होते. यात अॅसिड कमी आणि गोडवा जास्त असतो. ही स्ट्रॉबेर मिकियो ओकुदा ग्रीनहाउस लावतो. नंतर हळूहळू ती पिकते. लिलावादरम्यान या प्रजातीची एक स्ट्रॉबेरी 350 यूएस डॉलर म्हणजे 29 हज़ार रूपयांना विकली जाते.