अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 19:52 IST2025-10-28T19:50:24+5:302025-10-28T19:52:01+5:30
Jara Hatke News: उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथील गांधीनगर परिसतार असलेला एक ज्वेलरी शॉप सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या ज्वेलरी शॉपची रखवाली चक्क एक गावठी कुत्रा करत असल्याने हा शॉप चर्चेचा विषय ठरला आहे.

अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथील गांधीनगर परिसतार असलेला एक ज्वेलरी शॉप सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या ज्वेलरी शॉपची रखवाली चक्क एक गावठी कुत्रा करत असल्याने हा शॉप चर्चेचा विषय ठरला आहे. राधाकृष्ण ज्वेलर्स नावाच्या या दुकानाचे मालक कृपाशंकर जयस्वाल यांनी त्यांच्या दुकानाच्या संरक्षणाची जबाबदारी सुरक्षा रक्षकांऐवजी आपल्या देशी कुत्र्याकडे सोपवली आहे.
या कुत्र्याचं नाव टायसन असं असून, हा कुत्रा केवळ दुकानाची राखवालीच करत नाही तर गळ्यात तब्बल ५० तोळ्यांची माळा घालून फिरतो. अत्यंत महागडी सोन्याची चेन घालून फिरणाऱ्या या कुत्र्याला पाहण्यासाठी दूर दूर वरून लोक येतात. तसेच आता या कुत्र्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
दुकानदाराने सांगितले की, टायसन हा दुकानाच्या आतबाहेर दोन्हीकडे सुरक्षेची जबाबदारी तो सांभाळतो. जेव्हा कुणी ग्राहक येतो तेव्हा केवळ वास घेऊन त्याची ओळख पटवतो. एवढंच नाही तर दुकानाच्या आजूबाजूला फिरणाऱ्या अनोळखी व्यक्तींवर लक्ष ठेवून असतो. टायसन याचं ही स्टाईल लोकांना खूप आवडत आहे.
या कुत्र्याबाबत लोकांनी सांगितलं की, हल्ली दुकानांच्या संरक्षणासाठी गार्ड आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावावे लागतात. तिथे कृपाशंकर जयसवाल यांनी देशी कुत्र्यालाचा सुरक्षा रक्षक बनवून एक वेगळंच उदाहरण समोर ठेवलं आहे. टायसनच्या गळ्यात ५० तोळ्यांची चेन असल्याचा दावा सोशल मीडियावरून केला जात आहे. मात्र सोन्याच्या चेनबाबत विचारलं असता दुकानदाराने त्याबाबत काहीही सांगण्यास नकार दिला.