sri lanka elephant strolls in hotel lobby poking stuff with his trunk twitter video viral | बापरे! हॉटेलमध्ये हत्ती शिरला आणि…; पाहा, व्हिडीओ!
बापरे! हॉटेलमध्ये हत्ती शिरला आणि…; पाहा, व्हिडीओ!

एका हॉटेलमध्ये हत्ती आल्याने उपस्थितांची तारांबळ उडाली. काही जणांनी घाबरून पळ काढला, तर काही जण आरडाओरड करत होते. यासंबंधीचा एक व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ श्रीलंकेतील एका हॉटेलमधील आहे. येथील एका हॉटेलच्या लॉबीमध्ये चक्क हत्ती आली होता. 

व्हिडीओमध्ये पाहिल्यावर समजते की, हत्ती हॉटेलच्या लॉबीमध्ये फिरत आहे. आपल्या सोंडेने हॉटेलमधील वस्तू उचलताना दिसत आहे. हत्ती सुरुवातीला हॉटेलमध्ये आल्यानंतर लोक भयभीत झाले. मात्र, त्यानंतर हत्ती शांतपणे इकडून तिकडे फेऱ्या मारत असल्याचे पाहून लोकांना मजा आली.

दरम्यान, हत्तीचा हा व्हिडीओ 19 जानेवारीला ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ आतापर्यंत 2 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर, 1.3 लाख लाइक्स आणि 32 हजारहून अधिक रिट्विट केला आहे. याशिवाय हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी याबाबत खालीलप्रमाणे प्रतिक्रिया दिल्या आहेत...

Web Title: sri lanka elephant strolls in hotel lobby poking stuff with his trunk twitter video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.