शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
6
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
7
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
8
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
9
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
10
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
11
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
12
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
13
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
14
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
15
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
16
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
17
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
18
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
19
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
20
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   

कोरोना संकटातील रिअल हिरो सोनू सूदचा खास गौरव; विमानावर झळकला फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 16:39 IST

Spice Jet Salutes Sonu Sood In A Unique Way : सोनू सूदने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान देशातील कामगार आणि गरीब लोकांना नि:शुल्क बसेस, गाड्या व विमानांद्वारे त्यांच्या घरी पोहोचण्यास मदत केली.

ठळक मुद्देदेशांतर्गत विमान कंपनी स्पाईस जेटने सोनू सूदला सलाम करताना आपल्या कंपनीच्या स्पायजेट बोईंग 737 वर त्याचे एक मोठे छायाचित्र काढले आहे.

मुंबई -  अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) कोरोना संकट काळात हजारो लोकांना मदतीचा हात दिला. सोनू सूदने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान देशातील कामगार आणि गरीब लोकांना नि:शुल्क बसेस, गाड्या व विमानांद्वारे त्यांच्या घरी पोहोचण्यास मदत केली. या मदत कार्यामुळे सोनू सूदचे सर्वस्तरातून कौतुक करण्यात आले. यातच आता विमान कंपनी स्पाईस जेटने सोनू सूदच्या या कामाचा अनोख्या पद्धतीने गौरव केला आहे. (spicejet salutes sonu sood for his philthropic work in a very special way)

देशांतर्गत विमान कंपनी स्पाईस जेटने सोनू सूदला सलाम करताना आपल्या कंपनीच्या स्पायजेट बोईंग 737 वर त्याचे एक मोठे छायाचित्र काढले आहे. या छायाचित्रासह सोनूसाठी इंग्रजीत एक खास ओळ लिहिलेली आहे. 'ए सॅल्यूट टू दी सेव्हियर सोनू सूद' म्हणजेच 'मसिहा सोनू सूदला सलाम.'

दरम्यान, सोनू सूदने या स्पायजेट बोईंग 737 चा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करत स्पाईस जेटचे आभार मानले आहेत. तसेच, अनारक्षित तिकिटावर मोग्याहून मुंबईला आल्याची आठवण झाली. माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचा आभारी आहे. माझ्या नातेवाईंकांना भरपूर मिस करतोय, असे सोनू सूदने म्हटले आहे.

(LMOTY 2020: सोनू सूदचे नागपूरशी आहे खूप जवळचे नाते, कसे ते घ्या जाणून)

विशेष म्हणजे, कोरोना साथीच्या काळात सोनू सूदने देशभरात अडकलेल्या अनेक गरीब लोकांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी केवळ मदत केली नाही तर जगभरातील उझबेकिस्तान, रशिया, अल्माटी, किर्गिस्तान या देशांमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनाही मदत केली होती. यासह, सोनू सूदने कोरोना संकट काळात कार्यरत सर्व डॉक्टर आणि फ्रंटलाइन कामगारांना देखील भरपूर मदत केली आहे.

(LMOTY 2020 : 'सोनू सूद हे करू शकतो तर सरकार का नाही?'; अभिनेत्याच्या उत्तरानं जिंकली सर्वांची मनं)

टॅग्स :spicejetस्पाइस जेटSonu Soodसोनू सूदcorona virusकोरोना वायरस बातम्याbollywoodबॉलिवूड