शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

या उकाड्यात घर गारेगार ठेवण्याचे खास उपाय, एकदा करून बघाच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 13:05 IST

Summer Tips : उन्हाळ्यात घर थंड ठेवण्यासाठी तुम्ही काही खास आणि सोपे उपाय करु शकता. अशाच काही घर थंड ठेवण्याच्या टीप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

Summer Tips :  उन्हाचा सपाटा सध्या सगळीकडेच खूप वाढला आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे आणि उन्हाच्या झळांनी जगणं कठिण होऊन जातं. बाहेर गेलं तरी गरम आणि घरात आलं तरी गरम. अशात गरमी दूर करण्यासाठी अनेकजण एसीचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. पण एसीचे सुद्धा अनेक दुष्पपरिणाम होतात. अशावेळी उन्हाळ्यात घर थंड ठेवण्यासाठी तुम्ही काही खास आणि सोपे उपाय करु शकता. अशाच काही घर थंड ठेवण्याच्या टीप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

1) आईस फॅन

ही एक झक्कास आयडिया वापरून तुम्ही घर थंड ठेवू शकता. महत्वाची गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला फार काही करण्याचीही गरज नाही. यासाठी तुम्हाला एक टेबल फॅन, एक स्टीलचं भांडं आणि बर्फ इतक्याच वस्तू हव्यात. त्या भांड्यात बर्फ ठेवून ते भांडं फॅनसमोर ठेवा आणि थंड वा-याने गरमी पळवा. स्टीलचं भांडं हे छिद्र असलेलं असेल तर आणखीन चांगलं होईल. कारण बर्फाचं झालेलं पाणीही नंतर थंडावा देत राहतं. 

2) घर जरा मोकळं करा

तुमच्या घरात जेवढ्या जास्त वस्तू असतील तेवढी जास्त गरमी तुम्हाला होईल. अशावेळी घरातील काही जास्तीच्या वस्तू तुम्ही काही दिवसांसाठी बांधून ठेवू शकता. नायलॉनची चटई, जाड गालिचे, वुलनचे कारपेट अशा वस्तू दूर करा. असे केल्याने घर रिकामंही होईल आणि घरात हवा खेळती राहिल. 

3) घरात झाडे ठेवा

उन्हाळ्यात घर थंड ठेवण्यासाठी हाही एक चांगला पर्याय आहे. तुमच्या घराच्या बाल्कनीतील वेगवेगळ्या झाडांच्या कुंड्या, वेगवेगळे प्लांट घरात ठेवा. यानेही घरात थंड हवा राहते. 

4) शेड नेट

घर थंड ठेवण्यासाठी किंवा उन्हात थंडावा मिळवण्यासाठी घराच्या बाल्कीनीत किंवा खिडक्यांना शेड नेट लावल्यास फायदा होतो. ही शेड नेट बाजारात सहज उपलब्ध होते. 

5) पांढरा रंग

इतर गर्द रंगांचं घराचं छत अधिक गरम असतं. अशात घर थंड ठेवण्यासाठी घराच्या छताला पांढरा रंग दिल्यास चांगला फायदा होतो. पांढरा रंग किंवा पीओपीमुळे घर थंड राहतं. कारण पांढरा रंग हा रिफ्लेक्टरचं काम करतो.

6) दारं-खिडक्या उघडा

सकाळी आणि सायंकाळी तापमान कमी होतं. त्यामुळे या दोन्ही वेळात घराची दारं आणि खिडक्या उघड्या ठेवा.

7) कपड्यांचा रंग

उन्हाळ्यात घरात हलक्या रंगांचे पडदे आणि बेड-शीटचा वापर करा. खासकरुन कॉटनच्या बेडशीट्स आणि पिलो कव्हर वापरा. बाहेर जाताना कॉटनचे पांंढरे कपडे वापरा. डोक्याला, कानाला आणि नाकाला पांढरा रूमाल किंवा दुपट्टा बांधा.

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य