Spacesuits Artemis astronauts wear on the moon NASA | स्पेस सूटचा आतापर्यंतचा प्रवास, नासा तयार करतंय चंद्रावर जाण्यासाठी नवीन स्पेस सूट!
स्पेस सूटचा आतापर्यंतचा प्रवास, नासा तयार करतंय चंद्रावर जाण्यासाठी नवीन स्पेस सूट!

(Image Credit : pressfrom.info)

पन्नास वर्षांआधी चंद्रावर मनुष्याचं पोहोचणं शक्य नसतं झालं, जर स्पेस सूट नसता. गेल्या ५० वर्षांमध्ये अंतराळ विज्ञानासोबतच स्पेस सूट्सचं तंत्रही बदललं आणि आणखी प्रगत होत गेलं. जगातल्या सर्वात पहिल्या स्पेस सूटचं नाव मर्करी होतं. हा सूट १९६० मध्ये दुसऱ्या महायुद्धातील फायटर पायलट्सच्या सूटच्या आधारावर तयार करण्यात आला होता. या सूटचा रंग सिल्व्हर होता. अंतराळातील अंधारात अंतराळवीरांना याने सहज शोधलं जातं.

त्यानंतर १९६९ मध्ये जे स्पेस सूट आले, त्यांना ४७ माप अपोलो सूट म्हटलं जात होतं. हा सूट चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणाऱ्या नील आर्मस्ट्रॉंग आणि त्यांच्या साथीदारांनी घातला होता. या सूटमध्ये लावण्यात आलेल्या पाइपच्या माध्यमातून ऑक्सिजन आणि पाण्याचा सप्लाय केला जात होता. जेणेकरून शरीराचं तापमान स्थिर ठेवता यावं.

पुढे १९८६ मध्ये पहिल्यांदा नारंगी रंगाचा स्पेस सूट तयार करण्यात आला. या रंगामुळे या सूटला पंपकिन सूटही म्हटलं जातं. नंतर २०११ मध्ये बोइंगने सर्वात हलका सूट डिझाइन केला. या सूटचे हॅंड ग्लव्स, शूज आणि हेलमेटचं वजन ७ किलो आहे. जे आधीच्या सूटच्या तुलनेत अर्ध आहे. हलका असल्याने अंतराळवीर हा संपूर्ण मिशन दरम्यान वापरू शकतात.

खाजगी स्पेस एजन्सी एक्सने २०१८ मध्ये त्यांचा थ्री डी प्रिंटेड स्पेस एक्स सूट लॉन्च केला. हा डोक्यापासून ते पायापर्यंत एका तुकड्याने तयार केला आहे. यालाच हॅंडग्लव्स, हेलमेट आणि शूज अटॅच होते. 

२०१८ मध्ये इस्त्रोने त्यांचा सूट लॉन्च केला होता आणि आता नासाने नवीन जनरेशनचा स्पेस सूट तयार केला आहे. हा सूट घालून अंतराळवीर पन्नास वर्षांनंतर पुन्हा एकदा चंद्राचा प्रवास करू शकतील.


Web Title: Spacesuits Artemis astronauts wear on the moon NASA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.