शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

‘स्पेस-आऊट कॉम्पिटिशन’! ‘टाइमपास’ करा, शांत बसा, बक्षीस जिंका; या देशात भन्नाट स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 07:59 IST

दक्षिण कोरियामध्ये २०२४ पासून अशा प्रकारची स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. दक्षिण कोरियात लोक खूप काम करतात

दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथील एका विस्तीर्ण मैदानावर शेकडो लोक जमलेले होते. सगळे जण निवांत बसलेले होते. कोणाच्याच चेहऱ्यावर कुठलाच तणाव नव्हता की कोणाला कसली घाई आहे असं दिसत नव्हतं. सगळे जण एकदम रिलॅक्स दिसत होते. किंबहुना त्यासाठीच सारे जण इथे जमले होते. प्रत्येक जण एका ओल्या मॅटवर बसला होता. कारण नुकताच पाऊस पडून गेला होता. काही जण त्या मॅटवर लोळलेले होते. काही जण आकाशाकडे पाहात होते. काही जण सुखासनात बसले होते. काहींनी डॉक्टरांचा पोशाख घातला होता, काहींनी डेन्टिस्टचा, काही जण आपल्या ऑफिसच्या पोशाखात होते, काही जण कामगारांच्या, तर काही जण विद्यार्थ्यांच्या..

खरं तर दक्षिण कोरिया हा ‘कामसू’ लोकांचा देश म्हणून परिचित आहे. प्रत्येक जण काहीना काही कामात असतो. त्यांना टाइमपास करायला आवडत नाही. मग असं असूनही आकाशाच्या उघड्या छताखाली इतके सारे लोक काहीही काम न करता, असे ‘टाइमपास’ करत कशासाठी बसले होते? - खरं तर ही होती एक अत्यंत अनोखी स्पर्धा. या स्पर्धेचं नाव ‘स्पेस-आऊट कॉम्पिटिशन’! म्हणजे कामधाम सोडून ‘आराम’ करण्यासाठी, रिलॅक्स होण्यासाठीची स्पर्धा! स्पर्धेसाठी जमलेल्या ज्या व्यक्तीचा हार्ट रेट जास्तीत जास्त स्टेबल असेल, म्हणजे ज्याच्या हृदयाची गती सर्वाधिक स्थिर असेल, तो विजेता ठरणार होता. त्यासाठी भलंमोठं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. 

केवळ दक्षिण कोरियातीलच नव्हे, तर जगभरातील अनेक देशांतील ‘स्पर्धक’ या आगळ्यावेगळ्या स्पर्धेसाठी येथे हजर होते. पण स्पर्धेपेक्षाही लोकांनी रोजच्या ताणतणावापासून, कामाच्या धबडग्यातून मुक्त व्हावं, रोजची धावपळ-चिंता बाजूला ठेवावी, काहीही न करता नुसतं बसून राहाणं म्हणजे टाइमपास किंवा वेळ वाया घालवणं नाही, तर तो तुमच्या आयुष्याचा एक अतिशय महत्त्वाचा, अविभाज्य घटक आहे, हे लोकांनी लक्षात घ्यावं आणि अधूनमधून ‘काहीही काम न करता नुसतं बसून राहावं’, रिलॅक्स करावं, रिलॅक्स होणं शिकावं यासाठीच ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती! स्पर्धेचे नियमही अतिशय साधे-सोपे होते. मुख्य अट केवळ एकच.. काहीही न करता नुसतं बसून राहा, आराम करा. रिलॅक्स व्हा; पण हे करत असताना झोपायचं मात्र नाही! रिलॅक्स करताना तुम्ही झोपूनच गेलात, तर मग मात्र तुम्हाला स्पर्धेसाठी अपात्र ठरवण्यात येईल!

दक्षिण कोरियामध्ये २०२४ पासून अशा प्रकारची स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. दक्षिण कोरियात लोक खूप काम करतात. इतकं की त्याला ‘शिक्षा’ म्हणजे ‘पनिशिंग वर्क कल्चर’ म्हटलं जातं! विकसित जगात त्यांचा ‘कामाचा दिवस सर्वांत मोठा’ असतो. ‘ओव्हरवर्क’ आणि त्यामुळे ‘बर्नआऊट’ होणं या गोष्टी तिथे सामान्य आहेत. दक्षिण कोरियात १९ ते ३४ वयोगटातील तरुणांना लक्ष्य करून २०२२मध्ये एक सर्व्हे करण्यात आला होता. त्यात दर तिनातला एक जण अति ताणानं त्रस्त होता, जवळपास ३८ टक्के तरुणांना करिअरचं टेन्शन होतं, २१ टक्के तरुणांवर कामाचा ओव्हरलोड होता.. गेल्यावर्षी तिथे गाढ झोपेचीही स्पर्धा घेण्यात आली होती. जो सर्वाधिक गाढ झोपेल, तो जिंकला!

टॅग्स :World Trendingजगातील घडामोडी