(Image Credit : nytimes.com)
नेहमीच उत्तर कोरियासोबत बिघडलेल्या नात्यांमुळे चर्चेत राहणारा साऊथ कोरिया देश आजकाल एका वेगळ्याच अडचणीत सापडला आहे. त्यांची ही अडचणी म्हणजे इथे वाढत जाणाऱ्या पॉप कल्चरचा प्रभाव. याने सरकारची डोकेदुखी इतकी वाढली आहे की, सरकारने हे दाबण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण त्यात ते अयशस्वी ठरले.
इतकेच नाही तर मंत्रालयाला लोकांची माफी सुद्धा मागावी लागली होती. साऊथ कोरियामध्ये 'के-पॉप' कल्चरने तरूणाई फार प्रभावित आहे. त्यांना लोकांना त्यांच्यासारखंच दिसायचं आहे. त्यांच्यासारखं दिसण्यासाठी लोक कॉस्मेटिक्सचा वापर करतात. इतकेच नाही तर अनेकजण प्लास्टिक सर्जरी करण्यासाठी तयार असतात.
यावर कोरिया सरकारने लैंगिक समानता मंत्रालयाने काही आदेश दिलेत. जेणेकरून एकसारखे दिसणारे पॉपस्टार कमी दिसावे. मंत्रालयाने लिहिले की, सर्वच गायक एकसारखे दिसतात. सगळेच सडपातळ असतात, एकसारखं मेकअप करतात आणि कमी कपडे परिधान करतात. हे सगळे जुळे आहेत का?
मंत्रालयाचा तर्क होता की, एकसारखं दिसणं सुंदरतेच्या व्याख्येला कमजोर करेल. ते म्हणाले की, यामुळे असमानता आणि लिंगभेदासारख्या समस्या वाढू शकतात. इतकेच नाही तर त्यांनी हेही सांगितले की, एकसारख्या दिसणाऱ्या लोकांना एकाच शोमध्ये कमी ठेवलं जावं.
पण सरकारच्या या गाइडलाइन्समुळे फॅन्स चांगलेच नाराज दिसले. त्यानंतर मंत्रालयाला त्यांची माफी मागावी लागली होती. त्यावेळी त्यांनी सांगितले की, या गाइडलाइन्सवर पुन्हा विचार करून काही गोष्टी यातून काढल्या जातील. काही लोकांनी या गाइडलाइन्सला हुकुमशाही सुद्धा म्हटलं.