Son sails solo acrosss atlantic to reach 90 year old father | वाह रे पठ्ठ्या! वृद्ध वडील होते दूर अन् फ्लाइट होत्या बंद, समुद्रातून एकटा बोट चालवत 85 दिवसांनी घरी पोहोचला....

वाह रे पठ्ठ्या! वृद्ध वडील होते दूर अन् फ्लाइट होत्या बंद, समुद्रातून एकटा बोट चालवत 85 दिवसांनी घरी पोहोचला....

कोरोना व्हायरसमुळे जगभरात लॉकडाऊन लागला आहे. अशात लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकजण गेल्या कित्येक महिन्यांपासून आपल्या परिवारापासून दूर कुठेतरी अडकले आहेत. लॉकडाऊनमधील अशीच एक घटना अर्जेटिनाच्या ब्यून्सआयर्समधून समोर आली आहे

अर्जेंटिनामध्येही इंटरनॅशनल फ्लाइट्स कॅन्सल केल्या आहेत. अशात जुआन मॅनुअल बॉलसेस्टरो एका बेटावर अडकला होता. बरेच दिवस तिथे काढले. पण कोरोना व्हायरसमुळे जगभरात बिघडत असलेल्या स्थितीत त्याला परिवारासोबत रहायचं होतं. त्याला 90 वर्षांच्या वडिलांच्या आरोग्याचीही चिंता होती.

(Image Credit : www.nytimes.com)

अशात त्याने समुद्रामार्गे घरी पोहोचण्याचा निर्णय घेतला. त्याने 29 फूटाची एक नाव तयार केली. त्यात त्याने खाण्या-पिण्याच्या सर्व वस्तू ठेवल्या आणि मार्च महिन्यातच अटलांटिक महासागरात उतरला. यादरम्यान तो मित्रांसोबत बोलला तेव्हा मित्रांनी त्याला असं करण्यास मनाई केली होती. अधिकाऱ्यांनी सुद्धा त्याला हे पाउल न उचलण्याचा सल्ला दिला होता. पण त्याने माघार घेतली नाही आणि प्रवासाला सुरूवात केली.

12 एप्रिलला तो केप वर्ड येथे पोहोचला. तिथे अधिकाऱ्यांनी त्याला जेवण दिलं. त्याला इंधानाची गरज होती. पण त्याला द्वीप राष्ट्रात एन्ट्री करण्याची परवानगी मिळाली नाही. अशात तो घरी पोहोचण्यासाठी हवेवरच निर्भर राहिला. 

जुआन हा पहिल्यांदाच समुद्राचा प्रवास करत होता असं नाही. पण तो पहिल्यांदा एकटा इतक्या लांब प्रवासावर निघाला होता. अशात अनेक अडचणींचा सामना करत तो पुढे जात राहिला. वेनेजुएला, श्रीलंका, हवाई, कोस्टा रिका, ब्राझील, अलास्का आणि स्पेनमध्ये त्याने काही वेळ आराम केला.

हा प्रवास करण्यासाठी त्याला तब्बल 85 दिवसांचा कालावधी लागला. पण त्याच्या इच्छाशक्तीने त्याला थांबू दिलं नाही आणि तो सतत प्रवास करत राहिला. अखेर तो 85 दिवसांनी आपल्या घरी पोहोचला.

वाह रे नशीब! खाणीत काम करताना सापडली दोन किंमती अन् मोठी रत्ने, मजूर रातोरात झाला कोट्याधीश...

बाबो! माशांऐवजी जाळ्यात 'जे' अडकलं ते पाहून हैराण झाले मच्छिमार, 230 कोटी रूपये आहे याची किंमत...

Web Title: Son sails solo acrosss atlantic to reach 90 year old father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.