सासूच्या प्रेमात पडला जावई, रात्री भेटायला गेला अन् कुटुंबियांनी रंगेहाथ पकडलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 10:11 IST2023-12-12T10:11:02+5:302023-12-12T10:11:19+5:30

यावेळी या तरूणाला गावातील लोकांनी रंगेहाथ पकडलं आणि त्याला झाडाला बांधलं.

Son-in-law fell in love with mother-in-law, went to visit at night and was caught red-handed by the family | सासूच्या प्रेमात पडला जावई, रात्री भेटायला गेला अन् कुटुंबियांनी रंगेहाथ पकडलं...

सासूच्या प्रेमात पडला जावई, रात्री भेटायला गेला अन् कुटुंबियांनी रंगेहाथ पकडलं...

अनैतिक संबंधाच्या अनेक अजब अजब घटना जगाच्या कानाकोपऱ्यातून नेहमीच समोर येत असतात. अनेक नात्यांच्या सीमा पार करून प्रेमसंबंध ठेवले जातात. पण एका व्यक्तीला असं करणं फारच महागात पडलं. पत्नीऐवजी ही व्यक्ती सासूच्या प्रेमात पडली आणि रात्रीच्या अंधारात तिला भेटण्यासाठी गेली. पण यावेळी या तरूणाला गावातील लोकांनी रंगेहाथ पकडलं आणि त्याला झाडाला बांधलं. यानंतर याची सूचना त्याच्या पत्नीला देण्यात आली आणि पत्नी घटनास्थळी आली व तिने पतीला झाडूने मारहाण केली. 

बिहारच्या जमुई जिल्ह्यातील कला गावातील ही घटना आहे. गावातील लोकांनी आपल्या प्रेयसी सासूला भेटण्यासाठी पोहोचलेल्या तरूणाला पकडलं. त्यानंतर त्याला झाडाला बांधून त्याची धुलाई केली.

मामे सासूच्या प्रेमात पडून खाल्ला मार

इथे राहणारा सुनील कुमार नावाचा तरूण नात्याने पत्नीची मामी लागणाऱ्या महिलेच्या प्रेमात पडला. ती कला गावात राहणारी आहे. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांचं भेटणं सुरू झालं. सुनील आधीच विवाहित आहे आणि तीन मुलांचा वडील आहे. दरम्यान तो त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचला होता. याची माहिती गावातील लोकांना मिळाली आणि त्यांनी त्याला पकडलं. त्यानंतर त्याला झाडाला बांधलं.

सुनीलला झाडाला बांधल्यावर त्याची पत्नी घटनास्थळी पोहोचली आणि चप्पल, झाडूने पतीला मारहाण केली. यावेळी गावातील लोकांची इथे मोठी गर्दी जमा झाली होती. या घटनेचा काही लोकांनी व्हिडीओ काढला. पण या घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली नाही. 

Web Title: Son-in-law fell in love with mother-in-law, went to visit at night and was caught red-handed by the family