भारतातील 'या' राज्यातील काही गावांत स्त्रिया ब्लाऊजशिवायच नेसतात साडी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 12:31 IST2018-08-08T12:23:56+5:302018-08-08T12:31:58+5:30
भारत विविधतेने नटलेला देश आहे, असे अनेकदा म्हटले जाते. संपूर्ण देशभरात अनेक गोष्टींमध्ये विविधता आढळून येते. त्यामध्ये पोशाख, खाद्यपदार्थ, संस्कृती, परंपरा यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो.

भारतातील 'या' राज्यातील काही गावांत स्त्रिया ब्लाऊजशिवायच नेसतात साडी!
(Image Creadit : rochakpost)
भारत विविधतेने नटलेला देश आहे, असे अनेकदा म्हटले जाते. संपूर्ण देशभरात अनेक गोष्टींमध्ये विविधता आढळून येते. त्यामध्ये पोशाख, खाद्यपदार्थ, संस्कृती, परंपरा यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो. पण विविधता असली तरीही अनेक गोष्टींना देशाच्या पारंपारिक गोष्टी म्हणून ओळखलं जातं. त्यातीलच एक म्हणजे साडी. आधीपासूनच भारतामध्ये स्त्रिया साडी नेसतात. ती नेसण्याची पद्धत जरी वेगळी असली तरीही तिचा समावेश पारंपारिक पोशाखांमध्ये करण्यात येतो. साधारणतः साडी आणि तिच्यासोबत चोळी म्हणजेच ब्लाऊज हा पोशाख आहे.
सध्या साडी आणि ब्लाऊजमध्ये अनेक वेगवेगळे ट्रेन्ड आढळून येतात. यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका असते, ती म्हणजे ब्लाऊजची. साडी कितीही साधी असली आणि तिच्या भरजरीत ब्लाऊज घातला तर त्यामुळे एक वेगळा लूक तुम्हाला येतो. पण असं असलं तरीही तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, भारतातील एक राज्य असंही आहे. जिथं स्त्रिया साडीवर ब्लाऊज घालत नाहीत. ही पद्धत फार पूर्वपार चालत आली असून यापाठीमागे एक असं कारण दडलेलं आहे, जे ऐकून तुम्हाला हादरा बसल्याशिवाय राहणार नाही.
सध्या देशभरात स्त्रिया सुरक्षित आहेत की नाही, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रोज स्त्रियांवर अत्याचार झाल्याच्या अनेक घटना आपल्या कानावर येत असतात. अनेकदा वाढत्या अत्याचारांना सध्याची बदललेली परिस्थिती आणि स्त्रियांचे आधुनिक पोशाख यांनाच दोष दिला जातो. परंतु या गावात आधीपासूनच स्त्रिया ब्लाऊजशिवाय साडी नेसतात. हे गाव छत्तीसगढ राज्यातील आहे. या राज्यातील आदिवासी स्त्रिया फार पूर्वीपासून ब्लाऊज घालत नाहीत. या गावातील परंपरेनुसार स्त्रियांना ब्लाऊज घालण्याची परवानगी नाही. या परंपरेनुसार महिला स्वतःही ब्लाऊज घालत नाहीत आणि गावातील इतर स्त्रियांनाही ब्लाऊज घालू देत नाहीत. या भागात राहणारी लोकं अनेक वर्षांपासून या परंपरेचं पालन करत आहेत.
(Image Creadit : Panjab kesari)
काही दिवसांपूर्वीच अशा बातम्या आल्या होत्या की, या गावातील काही मुलींनी साडीवर ब्लाऊज घालण्यास सुरुवात केली होती. पण त्या मुलींवर गावकऱ्यांनी परंपरा मोडल्याचा आरोप लावला होता. आजही या गावातील वयोवृद्ध व्यक्ती ही परंपरा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ब्लाऊजशिवाय साडी नेसण्याच्या पद्धतीला गातीमार स्टाईल म्हटलं जातं. जवळपास एक हजार वर्षांपासून या गावातील महिला या परंपरेचं पालन करत आहेत.
या गावातील महिलांचा असा समज आहे की, ब्लाऊजशिवाय साडी नेसल्याने काम करताना कोणत्याही अडचणी येत नाहीत. त्याचप्रमाणे शेतात काम करणं आणि ओझी उचलणं देखील सोपं होतं. अनेक ठिकाणी जंगलात राहणाऱ्या आदिवासी स्त्रिया उन्हाळ्यात गरम होतं म्हणून ब्लाऊज घालणं टाळतात. तेच शहरांमध्ये साडीवर ब्लाऊज न घालणं ही फॅशन समजली जाते.