Viral Video : बापरे! जींवत असताना तरूणानं पेटीत बंद करत दफन केलं; ५० तास उलटताच झालं असं काही....
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 17:56 IST2021-04-05T17:41:32+5:302021-04-05T17:56:54+5:30
Viral Video : जिमीचा हा विचित्र कारनामा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे

Viral Video : बापरे! जींवत असताना तरूणानं पेटीत बंद करत दफन केलं; ५० तास उलटताच झालं असं काही....
मेलेल्या माणसाला तुम्ही दफन होताना तुम्ही पाहिलं असेल पण तुम्ही कधी जीवंत माणसाला दफन होताना पाहिलंय का?. युट्यूबर जिमी डोनाल्डसन या तरूणानं फक्त स्वतःला दफनच केलं नाही तर दफन केल्यानंतर काय होतं हे जगासमोर मांडलं आहे. जिमीचा हा विचित्र कारनामा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ही व्हिडीओ मिस्टर बेएस्टनं युट्यूब चॅनेलवर २८ मार्चला शेअर केला होता. इन्स्टाग्रामवर आतापर्यंत ६० मिलियनपेक्षा जास्त व्हिव्हज् या व्हिडीओला मिळाले आहेत. तुमचा विश्वास बसणार नाही पण या तरूणानं ५० तास जमिनीखाली घालवले आहेत.
१२ मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता ५० तासांसाठी हा तरूण जमीनीखाली आहे. चादर, उशी आणि पाण्याच्या बाटल्यांसह हा माणूस झोपलेला दिसून येत आहे. एका वॉकी-टॉकीच्या साहाय्यानं बाहेर उभ्या असलेल्या आपल्या मित्रांशी संपर्क साधत आहे.
आजार राहूदे पण इंजेक्शन आवर! लस घेताना आजींनी दिली भयानक रिएक्शन, पाहा व्हिडीओ
जीमी यानी पेटीत २० तास एकाच स्थितीत राहिल्यांतर हालचाल करून शारिरीक स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. एका लहानश्या पेटीत उभं राहणं शक्य नाही म्हणून झोपून राहण्याशिवाय पर्याय नव्हता. दुसरीकडे त्याचे मित्र गप्पा मारताना दिसून येत आहेत.
पेटीत एक दिवस पूर्ण घातल्यानंतर जिमीला कसं वाटतंय असा प्रश्न विचारण्यात आला त्यानंतर त्यानं सांगितलं की, ''माझ्या पाठीत खूप वेदना होत आहे. खाली पेटीत करण्यासारखं काहीही नव्हतं म्हणून मला खूपच बोअर झालं आहे. आतून खूपच घाणेरडा वास येत होता. कृपया असा स्टंट करण्याचा प्रयत्न करू नका.''
युट्यूबवर या व्हिडीओला ४४ हजारांपेक्षा जास्त युजर्सनी लाईक केलं आहे. कोविडबद्दल सुरू होती Zoom Meeting; अचानक नेत्याची बायको नग्नावस्थेत मागे उभी राहिली अन् मग....