धूम्रपान करणाऱ्यांचा 'गेम'! सिगारेट ओढताच टॉयलेटचा दरवाजा होणार ट्रान्सपरंट; धूर सोडला तर सर्वांना दिसणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 20:17 IST2026-02-21T20:15:50+5:302026-02-21T20:17:46+5:30

मॉल्स प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ग्राहकांच्या तक्रारींनंतरच हे पाऊल उचलण्यात आले आहे. विशेष काळजी म्हणून, चुकून स्मोक सेन्सर सक्रिय झाल्यास तो पूर्ववत करण्यासाठी तिथे 'रिसेट' बटणही व्यवस्था करण्यात येईल.

Smoker's game The toilet door will become transparent as soon as you smoke; if you let out smoke, everyone will see | धूम्रपान करणाऱ्यांचा 'गेम'! सिगारेट ओढताच टॉयलेटचा दरवाजा होणार ट्रान्सपरंट; धूर सोडला तर सर्वांना दिसणार!

धूम्रपान करणाऱ्यांचा 'गेम'! सिगारेट ओढताच टॉयलेटचा दरवाजा होणार ट्रान्सपरंट; धूर सोडला तर सर्वांना दिसणार!

सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणाऱ्यांना आळा घालण्यासाठी चीनने एक जबरदस्त तत्रज्ञान विकसित केले आहे. आता सार्वजनिक शौचालयात सिगारेट ओढताच तेथील दरवाजा ट्रान्सपरंट होईल. यामुळे आत बसलेली व्यक्ती बाहेरून स्पष्टपणे दिसेल. चीनच्या शेन्जेन प्रांतातील दोन मोठ्या ज्वेलरी शॉपिंग मॉल्समध्ये हे हायटेक दरवाजे बसवण्यात आले आहेत.

असं काम करतं हे तंत्रज्ञान -
साउथ चायना मॉर्निंग पोस्टमधील वृत्तानुसार, ग्वांगडोंग प्रांतातील शेन्झेन येथे असलेल्या शुईबेई इंटरनॅशनल सेंटर आणि शुईबेई जिन्झुओ बिल्डिंग या दोन दागिन्यांच्या शॉपिंग मॉलमधील शौचालयांच्या दरवाजांमध्ये हे विशेष काचेचे दरवाजे बसवण्यात आले आहेत. या दरवाज्यांची माहिती पहिल्यांदा १६ डिसेंबर रोजी चिनी सोशल मीडियावर शेअर करण्यात आली होती. तेव्हापासून, ते चीनमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत. काही लोक त्याचे कौतुक करत असताना, काही टीकाकार देखील आहेत.

ही काच सर्वसामान्यपणे अपारदर्शक असते, मात्र सिगारेटचा धूर येताच त्यातील सेन्सर सक्रिय होतात आणि काही सेकंदातच वीजपुरवठा खंडित होऊन काच पारदर्शक बनते. यासंदर्भात दरवाज्यावर एक स्पष्ट सूचनाही लिहिण्यात आली आहे: "जर तुम्ही सिगारेट ओढली तर काच पारदर्शक होईल. जर तुम्हाला ऑनलाइन प्रसिद्ध व्हायचे नसेल, तर सिगारेट ओढण्यावर नियंत्रण ठेवा."

सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया
शेन्जेन शहरात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी असूनही लोक त्याचे उल्लंघन करतात. अशा लोकांसाठीच हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. या नवीन तंत्रज्ञानाचे अनेकांनी स्वागत केले असून, "धूम्रपान करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी हा सर्वोत्तम मार्ग आहे," अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे. मात्र, काही लोकांनी गोपनीयतेच्या (Privacy) मुद्द्यावरून यावर टीकाही केली आहे.

मॉल्स प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ग्राहकांच्या तक्रारींनंतरच हे पाऊल उचलण्यात आले आहे. विशेष काळजी म्हणून, चुकून स्मोक सेन्सर सक्रिय झाल्यास तो पूर्ववत करण्यासाठी तिथे 'रिसेट' बटणही व्यवस्था करण्यात येईल.

Web Title : चीन का धूम्रपान विरोधी तकनीक: पारदर्शी शौचालय द्वार धूम्रपान करने वालों को उजागर करते हैं।

Web Summary : चीन ने धूम्रपान को रोकने के लिए मॉल में पारदर्शी शौचालय द्वार पेश किए। सेंसर धुएं का पता लगाते हैं, कांच को साफ कर देते हैं, जिससे अपराधी उजागर हो जाते हैं। कुछ लोगों द्वारा सराहे जाने पर, गोपनीयता संबंधी चिंताएँ उत्पन्न होती हैं। एक रीसेट बटन स्थापित किया जाएगा।

Web Title : China's Anti-Smoking Tech: Transparent Toilet Doors Expose Smokers.

Web Summary : China introduces transparent toilet doors in malls to deter smoking. Sensors detect smoke, turning the glass clear, exposing offenders. While praised by some, privacy concerns arise. A reset button will be installed.