शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

खासदाराला सॅंडविच चोरी करणं पडलं महागात, द्यावा लागला खासदारकीचा राजीनामा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 1:32 PM

आपल्या देशात आमदार आणि खासदारांचा काय दबदबा असतो किंवा ते काय काय करतात हे सर्वांनाच माहीत असतं.

आपल्या देशात आमदार आणि खासदार यांचा काय दबदबा असतो किंवा ते काय काय करतात हे सर्वांनाच माहीत असतं. काही समस्या किंवा गंभीर आरोप झाले तरी सुद्धा खासदार काही राजीनामा देत नाहीत. संसदेत कोणत्या मुद्द्यावरू काय गोंधळ होईल हेही आपण पाहिलंय. हा गोंधळ केवळ भारतातच नाही तर परदेशातील संसदेतही होतोच. यूरोपमधील स्लोवेनिया देशातील एक वेगळंच प्रकरण समोर आलं आहे. इथे एका खासदाराला सुपरमार्केटमधून सॅंडविच चोरी करणे महागात पडले आहे. या चोरीमुळे येथील संसदेत खासदाराविरोधात जोरदार विरोध झाला. नंतर खासदाराने त्याचा चोरीची कबुली दिली. 

स्लोवेनिया येथील सत्ताधारी पक्षाचे खासदार दारची क्रेजिसिच गेल्या आठवड्यात संसदेत देशातील सुव्यवस्थेवर होत असलेल्या चर्चेत सहभागी झाले होते. यावेळी या सॅंडविच चोरीचा उल्लेख झाला. तेव्हा खासदार दारजी यांनी सांगितले की, 'सॅंडविच घेताना सुपरमार्केटमधील कोणताही कर्मचारी त्यांच्याकडे लक्ष देत नव्हता. त्यामुळे काही वेळ वाट पाहून मी पैसे न देताच बाहेर आलो'.

जसा याबाबत संसदेत उल्लेख झाला तेव्हा विरोधी पक्षातील आणि सत्ताधारी पक्षातील काही लोकांना त्यांचा जोरदार विरोध केला. अनेक सदस्यांनी ही गोष्टी चुकीची असल्याचं सांगितलं. आपल्याला होणारा विरोध पाहून खासदार दारजी यांनी स्वत: त्यांचा राजीनामा स्पीकरकडे सोपवला. 

दारजी यांनी संसदेत स्वत: त्यांचा गुन्हा मान्य केला. पण त्यांनी हेही सांगितले की, हे त्यांचं एक सोशल एक्सपरिमेंट होतं. याचा उद्देश चर्चेदरम्यान सभागृह सदस्यांना सर्विलांस सिस्टमच्या टेस्टिंगबाबत सांगणे हा होता. तसेच त्यांनी हेही सांगितले की, नंतर ते त्याच दिवशी सुपरमार्केटमध्ये सॅंडविचचे पैसे देण्याकरीता गेले होते. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दारजी हे ५ महिन्यांपूर्वीच खासदार झाले होते. संसदेत त्यांचा विरोध झाला असला तरी सोशल मीडियातून त्यांच्या इमानदारीचं कौतुक करण्यात आलं. तर काही लोकांनी त्यांची खिल्लीही उडवली.  

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल