शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

बाप-पोरीच्या प्रेमाची गोष्ट, मुलीला लग्नात आयफोन 8 भेट देण्यासाठी वडिलांनी गाठलं सिंगापूर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 9:50 AM

मुलीला लग्नात आयफोन ८ भेट देण्यासाठी एका मुलीचे वडील भारतातून थेट सिंगापूरला पोहोचले.

ठळक मुद्देमुलीला लग्नात आयफोन ८ भेट देण्यासाठी एका मुलीचे वडील भारतातून थेट सिंगापूरला पोहोचले. ही व्यक्ती फोन खरेदी करण्यासाठी अॅपल स्टोअरच्या बाहेर १३ तास रांगेत उभी राहिली होती. अमीन अहमद ढोलिया असं या व्यक्तीचं नाव असून त्यांचं वय ४३ वर्ष आहे.

मुंबई- मुलगी आणि वडील यांच्याचील प्रेमाबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे. आपल्या मुलीच्या चेहऱ्यावर हसू उमटावं यासाठी वडील हवं ते करायला तयार असतात. विशेष म्हणजे मुलीने एखादी गोष्ट मागितली तर तिला ती गोष्ट देण्यासाठी धडपड वडील करताना दिसतात. मुलगी लहान असताना पुढे शाळेत गेल्यावर आणि त्यानंतर कॉलेजमध्ये गेल्यावर तिचे सगळे लाड पुर्ण केले जातात. आयुष्याच्या विविध टप्प्यावर त्या त्या ट्रेण्डनुसार वागायचा प्रयत्न हा नेहमीच वडिलांकडून केला जातो. विशेष म्हणजे मुलीचं लग्न हा वडिलांसाठी अतिशय हळवा क्षण असतो. लग्नानंतरही मुलगी सुखी राहावी यासाठी वडिलांची धडपड सुरु असतेच. असाच एक प्रसंग नुकताच घडला. आपल्या लाडक्या मुलीला लग्नात आयफोन ८ भेट देण्यासाठी एका मुलीचे वडील भारतातून थेट सिंगापूरला पोहोचले. विशेष म्हणजे प्रसिद्ध उद्योगपती असलेली ही व्यक्ती फोन खरेदी करण्यासाठी अॅपल स्टोअरच्या बाहेर १३ तास रांगेत उभी राहिली होती. 

अमीन अहमद ढोलिया असं या व्यक्तीचं नाव असून त्यांचं वय ४३ वर्ष आहे. अमीन ढोलीया मुलीला देण्यासाठीच्या आयफोन ८ च्या खरेदीसाठी सिंगापूरला तर गेलेच पण तब्बल 13 तास रांगेतही थांबले.  मी माझ्या २ मुलींसाठी २ फोन खरेदी करणार आहे. मी पहिल्यांदाच एखाद्या गोष्टीसाठी रात्रभर रांगेत थांबलो, असं अमीन ढोलिया यांनी म्हंटलं आहे. सकाळी जेव्हा कंपनीने आपलं दुकान उघडलं तेव्हा त्यांच्या रांगेत २०० हून अधिक जण होते. यातील बहुतांश लोक परदेशी होते, असंही ढोलिया यांनी सांगितलं आहे. नुकताच १२ सप्टेंबर रोजी आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लस लॉन्च करण्यात आला. इतर देशात कुठेच आयफोनचे हे नवीन मॉडेल लॉन्च न झाल्याने सिंगापूरमधील दुकानात मोठी गर्दी झाली होती. मे महिन्यात आयफोनचे सिंगापूरमधील हे स्टोअर सुरु झालं असून तेव्हापासून लॉन्च करण्यात आलेले हे पहिलेच मॉडेल्स आहेत. त्यामुळे मुलीला आयफोन 8 भेट देण्यासाठी तिच्या वडिलांना थेट सिंगापूर गाठावं लागलं.

आयफोन 8 ची वैशिष्ट्यंआयफोन 8च्या दोन्ही बाजूने ग्लास देण्यात आली आहे. सिल्वर, ग्रे आणि गोल्ड या तीन रंगात आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लस सादर करण्यात आला. या फोनचे सर्वांत महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे याला वायरलेस चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे युजरला प्रत्येक ठिकाणी चार्जर बाळगण्याची गरज भासणार नाही. आयफोन ८ चा डिस्प्ले हा ४.७ इंच तर आयफोन ८ प्लसचा डिस्प्ले हा ५.५ इंच इतका असेल. नवीन आयफोनची ग्लास आतापर्यंतची सर्वांत टिकाऊ ग्लास असेल. पाणी आणि धुळीपासून प्रतिरोध करणारा हा फोन आहे. यामध्ये 3D टच आणि ट्रू टोन डिस्प्ले आहे.