नवीन आयफोनची प्रतीक्षा संपली, पुढील महिन्यात येणार आयफोन 8

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 09:00 AM2017-08-25T09:00:00+5:302017-08-25T09:00:00+5:30

अ‍ॅपलने आपल्या आयफोन या मॉडेलची पुढील आवृत्ती पुढील महिन्यात लाँच करण्याचे संकेत मिळाले असून यातल्या आयफोन ८ या मॉडेलमध्ये तब्बल ५१२ जीबी स्टोअरेजी सुविधा असेल.

Apple iPhone 8 could be launched next month | नवीन आयफोनची प्रतीक्षा संपली, पुढील महिन्यात येणार आयफोन 8

नवीन आयफोनची प्रतीक्षा संपली, पुढील महिन्यात येणार आयफोन 8

Next
ठळक मुद्देआयफोनच्या दशकपूर्तीनिमित्त अ‍ॅपल कंपनी विशेष मॉडेल लाँच करेल असे मानले जात आहेआयफोन ८ या मॉडेलमध्ये तब्बल ५१२ जीबी स्टोअरेजी सुविधा असेलयानुसार आता सप्टेंबर महिन्यात आयफोनची नवीन आवृत्ती येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत

मुंबई, दि. 24 - अ‍ॅपलने आपल्या आयफोन या मॉडेलची पुढील आवृत्ती पुढील महिन्यात लाँच करण्याचे संकेत मिळाले असून यातल्या आयफोन ८ या मॉडेलमध्ये तब्बल ५१२ जीबी स्टोअरेजी सुविधा असेल.

आयफोनच्या दशकपूर्तीनिमित्त अ‍ॅपल कंपनी विशेष मॉडेल लाँच करेल असे मानले जात आहे. या अनुषंगाने ‘मॅक४एव्हर’ या संकेतस्थळाने एका लीकद्वारे आगामी मॉडेल्सबाबत लीक जाहीर केले आहे. हे संकेतस्थळ अचूक भाकीताबाबत प्रसिध्द असल्यामुळे याकडे गांभिर्याने पाहिले जाते. यानुसार आता सप्टेंबर महिन्यात आयफोनची नवीन आवृत्ती येणार असल्याचे ‘मॅक४एव्हर’ने जाहीर केले आहे. या वृत्तानुसार १२ सप्टेंबरला अ‍ॅपलने एका कार्यक्रमाचे आयोजन केले असून यात आयफोन ८ हे फ्लॅगशीप मॉडेल सादर करणार आहे. तर प्रत्यक्षात २२ सप्टेंबरपासून हे मॉडेल ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. यासोबत आयफोन ७एस आणि आयफोन ७एस प्लस हे दोन नवीन मॉडेलदेखील लाँच करणार असल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

आयफोनच्या प्रारंभीच्या मॉडेलमध्ये स्टोअरेजची मुख्य समस्या होती. नंतर यात सुधारणा करण्यात आली. आता तर आयफोन ८ या मॉडेलमध्ये तब्बल ५१२ जीबी स्टोअरेज असेल असा दावादेखील करण्यात आला आहे. यासोबत हे मॉडेल ६४, १२८ आणि २५६ जीबी स्टोअरेजच्या विविध व्हेरियंटमध्येही ग्राहकांना उपलब्ध केले जाईल असे मानले जात आहे. अर्थात स्टोअरेजबाबत आयफोन ८ नवीन विक्रम प्रस्थापित करण्याची शक्यता आहे. याशिवाय आयफोन ८ या मॉडेलमध्ये ५.८ इंच आकारमानाचा आणि अत्यंत स्लीम अशा कडा असणारा ओएलईडी डिस्प्ले असू शकतो. याच्या जोडीला वायरलेस चार्जींग, थ्री-डी चित्रीकरणास सक्षम व्हर्टीकल ड्युअल कॅमेरा सेटअप आदी फिचर्स यात असू शकतात. तर याच्या सोबतच आयफोन ७एस आणि आयफोन ७एस प्लस हे दोन नवीन मॉडेलदेखील सादर करण्यात येतील. यात आयफोन ८ मॉडेलच्या तुलनेत थोडे कमी दर्जेदार फिचर असतील हे स्पष्ट आहे. दरम्यान, याच कार्यक्रमात अ‍ॅपल कंपनी आपले थर्ड जनरेशन अ‍ॅपल स्मार्ट वॉच सादर करू शकते. तर अ‍ॅपल टिव्हीला फोर-के क्षमता प्रदान करत याची नवीन आवृत्तीदेखील यात येऊ शकते.

Web Title: Apple iPhone 8 could be launched next month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.