शहरं
Join us  
Trending Stories
1
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

वाह, मानलं गड्या! आईच्या हातची खीर विकून 'असे' करोडपती बनले हे पुण्याचे बहिणभाऊ

By manali.bagul | Updated: January 25, 2021 15:16 IST

पुण्यातील एका La Kheer Deli’ (LKD) आउटलेटची खीर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध होत आहे. या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची खीर खाण्याचा आनंद घेता येऊ शकतो.

आईच्या हातच्या जेवणाची मजाच काही वेगळी असते. तुम्ही जगभरात कुठेही गेलात तरी तुम्हाला आईच्या हातच्या जेवणाप्रमाणे चांगले जेवण मिळणार नाही. आईच्या हातचं जेवायला मिळणं जणूकाही स्वर्गसुखाप्रमाणेच आहे.  हिवाळा असो किंवा उन्हाळा खीर खाण्यासाठी कोणत्याही ऋतूचे बंधन नसते. पुण्यातील एका La Kheer Deli’ (LKD) आउटलेटची खीर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध होत आहे. या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची खीर खायचा आनंद घेता येऊ शकतो. मसलन, न्यूट्रेला, ब्राऊनी, चॉकलेट, ओरियो आणि  गुलकंद फ्लेवरची खीर तुम्हाला पुण्यात खायला मिळू शकते.

दोन भावडांनी सुरू केली खीरीची विक्री

विक्री शिवांग सूद आणि शिवाका सूद या दोघा भावंडांनी २०१९ ला खीरीची सुरू केली. त्यांची खीर भारतातील अनेक शहरांमध्ये  प्रसिध्द आहे.  द बेटर इंडियानं दिलेल्या माहितीनुसार २७ वर्षीय शिंवाग सुद यांनी सांगितले की, ''जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझी आई खीर बनवायची. संपूर्ण कुटुंब खूप प्रेमाने खीर खायचं. २०१७ मध्ये माझ्या बहिणीनं काहीतरी वेगळे प्रयोग करून खीर तयार करायचं ठरवलं. तिने खीरीत एक चमचा ओरिओ आणि एक चमचा नुटेला घातल्यानं या खीरीची चवच बदलली.'' 

आईनं मेहनत घेतली

पुढे त्यांनी सांगितले की,  ''माझ्या आईनं गुलकंद आणि ब्राऊनी घालून खीर बनवली होती. कुटुंबातील इतर लोकांनाही  ही खीर खूप आवडली. इतकचं नाही तर आईनं सगळ्याच नातेवाईकांना ही खीर खाऊ घातली.  ज्यांनी ज्यांनी ही खीर खाल्ली ते सगळेचजण बोटं चाखत राहिले. ''

अशी झाली सुरूवात

यांनी दिलेल्या माहितीनुसार ''सुरूवातीला आम्ही स्पोर्ट्स स्टार्टअप सुरू केलं होतं. त्यानंतर माझी बहिण शिविकानं मला आयडीया दिली. त्यानंतर आमच्या घरात तयार केली जाणारी खीर इतरांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीला भांडवल कमी असल्यामुळे आम्ही पुण्यातील औंढमध्ये हातगाडीवर खीर विकायला सुरूवात केली.  यात वेगवेगळ्या फ्लेवर्सचा समावेश होता.'' वाढलेलं वजन घटवण्यासाठी नीता अंबानींनी केले 'हे' २ उपाय; तुमच्यासाठीही ठरतील प्रभावी

हळूहळू  बिझनेस वाढत गेला

शिवांगने सांगितले की, ''पहिल्या दिवशी मित्रांच्या मदतीने खीरीचे ४४ डब्बे विकले. त्यानंतर आईनं  ८२ डब्बे खीर बनवली. तिसऱ्या दिवशी  १०० डब्बे खीर तयार झाली.  मार्केटिंग आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ब्रॅण्डिंग सुरू केले. लोकांचा चांगला प्रसिसाद मिळायला सुरूवात झाली.  लोकांनी प्री ऑर्डर करायला सुरूवात केली.  त्यानंतर २०१८ मध्ये पुण्याच्या जेओएम रोडवर एक दुकान भाड्यानं घेतलं. आमची पहिली कमाई ३३ लाख रुपये इतकी होती. त्यानंतर २०१८ मध्ये हा आकडा ८४ लाखांपर्यंत पोहोचला.  २०१९ आणि २०२० मध्ये  कमाई १ कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली. '' वाह रे नशीब! २० वर्षांपासून बिल्डींगमध्ये साफसफाई करायची; अन् एकेदिवशी घरच गिफ्ट मिळालं

आईने नोकरी सोडली

पुण्यातील 'ला खीर देली' हे दुकान आजही खूप फेमस आहे. यात सगळ्यात जास्त मेहनत सोनिया सुद यांची आहे. ५२ वर्षीय सोनिया यांनी आपल्या मुलांना मदत करण्यासाठी शाळेतील शिक्षकाची नोकरी सोडली आणि त्यांना या व्यवसायात मदत करायचं ठरवलं. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेPuneपुणेInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी