अंतराळात सोबत काय काय घेऊन गेले शुभांशू शुक्ला? मिशनचं रहस्यही त्यातच दडलंय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 16:13 IST2025-06-25T15:24:33+5:302025-06-25T16:13:31+5:30
Shubhanshu Shukla : शुभांशू यांनी नासाच्या केनेडी स्पेस सेंटरहून एक्सिओम-४ मिशनद्वारे आकाशाकडे भरारी घेतली. चार जणांच्या टीममधील ते एक सदस्य आहेत.

अंतराळात सोबत काय काय घेऊन गेले शुभांशू शुक्ला? मिशनचं रहस्यही त्यातच दडलंय...
Shubhanshu Shukla : भारताचे अंतराळवीर शुंभाशू शुक्ला हे आज (२५ जून २०२५) ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी रवाना झाले आहेत. ही प्रत्येक भारतीय व्यक्तीसाठी अभिमानाची बाब आहे. शुभांशू यांनी नासाच्या केनेडी स्पेस सेंटरहून एक्सिओम-४ मिशनद्वारे (Axiom 4 Mission) आकाशाकडे भरारी घेतली. चार जणांच्या टीममधील ते एक सदस्य आहेत. जे फॉल्कन-९ रॉकेटद्वारे ड्रॅगन स्पेसक्राफ्टमध्ये बसून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी निघाले.
याआधी एक्सिओम-४ मिशन अनेकदा पुढे ढकल्यात आलं होतं. लखनौला राहणारे शुभांशू शुक्ला एअरफोर्समध्ये ग्रुप कॅप्टन पदावर आहेत आणि भारताचे अंतराळवीर आहेत. १ वर्षाच्या ट्रेनिंगनंतर त्यांना स्पेस मिशनसाठी निवडण्यात आलं.
काय नेलं सोबत?
शुभांशू शुल्का या मिशनवर आपल्यासाठी खायला काय काय घेऊन गेले याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. सामान्यपणे मिशन होईपर्यंत पुरेल इतके खाद्य पदार्थ अंतराळवीर आपल्यासोबत नेतात. यात त्यांच्या आवडीच्या आणि टिकणाऱ्या गोष्टी असतात. शुभांशू शुल्का हे सोबत आमरस, मूग डाळ आणि गाजराचा हलवा घेऊन गेले आहेत.
खाण्याच्या या गोष्टींसोबतच शुभांशू शुक्ला त्यांच्यासोबत पांढऱ्या रंगाचं एक खेळणं हंसही घेऊन गेले आहेत. ज्याचं नाव 'जॉय' आहे. हे खेळणं मायक्रोग्रॅविटी इंडिकेटरच्या रूपात काम करेल.
मिशनचा उद्देश
हे मिशन केवळ एक प्रवास नाही तर विज्ञान आणि भविष्यातील अंतराळ मिशनसाठी एक प्रयोगही आहे. शुभांशू शुक्ला १४ दिवस स्पेस स्टेशनमध्ये राहून असे प्रयोग करतील जे भविष्यातील स्पेस मिशनसाठी गरजेचे आहेत. हे प्रयोग खासकरून भोजन आणि पोषणासंबंधी असतील.