धक्कादायक! केक खाऊन श्वास कोंडल्याने महिलेचा मृत्यू, स्पर्धेत खात होती केक!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 11:43 AM2020-02-01T11:43:34+5:302020-02-01T11:46:51+5:30

केकचं नुसतं नाव काढलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. केक खाण्याचं तर निमित्त लोकांना हवं असतं.

Shocking! Woman dies in cake-eating contest in Australia | धक्कादायक! केक खाऊन श्वास कोंडल्याने महिलेचा मृत्यू, स्पर्धेत खात होती केक!

धक्कादायक! केक खाऊन श्वास कोंडल्याने महिलेचा मृत्यू, स्पर्धेत खात होती केक!

googlenewsNext

(Image Credit : insider.com) (प्रातिनिधीक छायाचित्र)

केकचं नुसतं नाव काढलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. केक खाण्याचं तर निमित्त लोकांना हवं असतं. पण तुम्ही कधी कुणी केक खाऊन मृत्यूमुखी पडल्याचं ऐकलं का? अर्थातच असं काही तुम्ही ऐकलं नसेल. पण केक खाऊन एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ऑस्ट्रेलियातील ही धक्कादायक घटना एका खाण्याच्या स्पर्धेत घडली.

ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलॅंड शहरात गोड पदार्थ खाण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यातच ६० वर्षीय महिलेचा केक खाऊन मृत्यू झाला. इथे ऑस्ट्रेलिया डे निमित्ताने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात जास्तीत जास्त मिठाई खाण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 

(Image Credit : independent.co.uk)

याच गोड खाण्याच्या स्पर्धेत ६० वर्षीय महिलेने सहभाग घेतला होता. मात्र, जास्त केक खाऊन तोंड भरल्याने या महिलेचा श्वास कोंडला आणि तिचा मृत्यू झाला. आयोजकांनी या महिलेला वाचविण्याचा पूर्ण प्रयत्न केला, मात्र त्यांचा काही फायदा झाला नाही. 

ऑस्ट्रेलियामध्ये जास्तीत जास्त खाण्याच्या स्पर्धा नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. या वेळीही ऑस्ट्रेलिया डे निमित्त अनेक हॉटेल्समध्ये अधिक खाण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र महिलेच्या मृत्यूमुळे या स्पर्धेला गालबोट लागले.


Web Title: Shocking! Woman dies in cake-eating contest in Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.