शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

बायकोने चहा द्यायला केला उशीर, नवऱ्याला आला भयंकर राग, अन् पुढे घडलं भलतंच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 15:23 IST

वेळ झाली की अनेकांना चहा हवाच असतो...

Husband Wife, Tea: भारतात चहाप्रेमींची कमतरता नाही. तुम्हाला भारतात प्रत्येत कोपऱ्यात एक ना एक टपरी नक्की सापडेल. काही लोक चहा पिण्यासाठी दूरपर्यंत जातात, तर काही जण असे असतात की ज्यांना दिवसाची सुरुवात चहानेच व्हायला हवी असते. काहीजण चहाचे इतके चाहते असतात की ते दिवसभरात चार-पाच कप चहा पितात. अनेक लोकांसाठी चहा हे जणू व्यसनच असते. चहाप्रेमींची अनेक अकाउंट्सही सोशल मीडियावर पाहायला मिळतात. त्यामध्ये लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या चहाबद्दल माहिती दिली जाते. पण चहाचं प्रेम एखाद्या माणसाच्या आयुष्यात एक विचित्र बदल घडवून आणू शकतो असं म्हटलं तर...  पण हे खरं आहे. चहा करायला उशीर केल्याने एका पतीने फार विचित्र गोष्ट केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये समोर आली आहे.

वाचा, घटना नक्की काय?

चहाच्या कारणावरून पतीने पत्नीची चक्क हत्या केल्याची घटना घडली. ग्वाल्हेरच्या युनिव्हर्सिटी पोलीस स्टेशन अंतर्गत खुनाची घटना समोर आली आहे. मृत साधना रजक हिचा विवाह मोहित रजक राहत असलेल्या थाटीपूर गावात दोन वर्षांपूर्वी झाला होता. साधना रजक हिच्या लग्नात, ६ महिन्यांपासून पती-पत्नीमध्ये वाद होत होते, असे माहेरच्या लोकांचे म्हणणे आहे. यामुळे मोहित रजक साधना रजक यांना मारहाण करायचा. इतरांच्या मध्यस्थीने घरात बसून दोघांची समजूत काढली जात असे असे सांगण्यात आले.

अचानक काय घडलं?

दोन दिवसांपूर्वी मोहितने साधनाला चहा बनवायला सांगितला. त्यांच्यातील भांडणामुळे साधनाला चहा करायला थोडा वेळ लागला. यासाठी मोहितने साधनाला मारहाण केली. त्याचा राग इतका पराकोटीला गेला की मोहितने थेट तिचा गळा दाबला आणि त्यामुळे साधना यांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :husband and wifeपती- जोडीदारDeathमृत्यूPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश