धक्कादायक! 27 वर्षीय तरूणीने रिकाम्या पोटी केलं मद्यसेवन, जागेवरच झाला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 15:36 IST2020-07-21T15:31:23+5:302020-07-21T15:36:00+5:30
Alice Burton Bradford चं वय २७ होतं. तिने मद्यसेवन केलं आणि लगेच तिचा मृत्यू झाला. तिला हॉस्पिटलमध्ये नेण्याचीही संधी मिळाली नाही.

धक्कादायक! 27 वर्षीय तरूणीने रिकाम्या पोटी केलं मद्यसेवन, जागेवरच झाला मृत्यू
मद्यसेवन हे आरोग्यासाठी हानिकारक आहे हे सर्वांनाच माहीत आहे. पण असं कधी तुम्ही ऐकलंय का की, मद्यसेवन केल्यावर लगेच कुणाचा मृत्यू झालाय? तोही एका २७ वर्षीय तरूणीचा. अशी एक घटना समोर आली आहे. Alice Burton Bradford चं वय २७ होतं. तिने मद्यसेवन केलं आणि लगेच तिचा मृत्यू झाला. तिला हॉस्पिटलमध्ये नेण्याचीही संधी मिळाली नाही.
मेट्रोने दिलेल्या वृत्तानुसार, ही Brighton मधील घटना आहे. एलिसला तिच्या घराच्या गार्डनमध्येच मृत्यू झाला. असे सांगितले जात आहे की, तिने अनोशा पोटी मद्यसेवन केलं होतं, ज्या कारणाने तिला Alcoholoic Ketoacidosis झाला. ज्यामुळे तिचा मृत्यू झाला.
तिच्या मित्रांनी मीडियाला सांगितले की, एलिस कधीही मद्यसेवन करत नव्हती. ती फिटनेस फ्रीक होती. ती नेहमी सायकलिंग आणि रनिंगवर जोर देत होती. अनेक मॅरेथॉनमध्येही तिने भाग घेतला होता. ती एका रनिंग ग्रुपची मेंबरही होती. Aaron जी एलिसला आठ वर्षांपासून ओळखते तिने सांगितले की, ही घटना धक्कादायक आहे. तिने सांगितले की, एलिस जेवणही कमी करत होती.
तिने पुढे सांगितले की, एलिस तिच्या पाळीव कुत्र्याला रोज सकाळी बाहेर फिरायला घेऊन जात होती. त्यासोबतच ती रोज रनिंग करत होती. लॉकडाऊनमुळे तिचा कोणताही मित्र किंवा मैत्रीण अंत्यसंस्काराला जाऊ शकले नाहीत. पण मद्यसेवन आरोग्यासाठी किती नुकसानकारक आहे याचं हे उदाहरण आहे.
मोठं यश! चक्क कचऱ्यापासून तयार केलं हॅंड सॅनिटायजर, ५ वर्षांपासून प्रयत्नात होती महिला वैज्ञानिक