बोंबला! जेवणात सापडला केस म्हणून त्याने पत्नीचं केलं टक्कल, १४ वर्षांची होऊ शकते शिक्षा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 11:58 IST2019-10-11T11:53:04+5:302019-10-11T11:58:13+5:30
जेवता जेवता ताटातील एखाद्या पदार्थात केस सापडणं काही मोठी गोष्ट नाही. अनेकजण अशावेळी केस काढून बाजूला टाकतात आणि जेवणावर फोकस करतात.

बोंबला! जेवणात सापडला केस म्हणून त्याने पत्नीचं केलं टक्कल, १४ वर्षांची होऊ शकते शिक्षा!
(Image Credit : sde.co.ke)(सांकेतिक फोटो)
जेवता जेवता ताटातील एखाद्या पदार्थात केस सापडणं काही मोठी गोष्ट नाही. अनेकजण अशावेळी केस काढून बाजूला टाकतात आणि जेवणावर फोकस करतात. पण बांग्लादेशातील एक व्यक्तीला जरा जास्तच राग आला. त्याच्या जेवणात केस आढळला आणि त्याने यात रागात पत्नीचे केस कापले. त्याने त्याच्या पत्नीचं टक्कल केलं. खरंच... हे जरा जास्तच झालं.
बांग्लादेशातील जयपूरहटमधील ही घटना आहे. ३५ वर्षीय बबलू मंडल याला पोलिसांनी अटक केली. रिपोर्ट्नुसार, पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'बबलूच्या पत्नीने त्याला दूध आणि भात दिला होता. यात एक केस आढळला. या रागात त्याने पत्नीचे सर्व केस कापले. ब्लेडच्या मदतीने त्याने तिचं जबरदस्तीने टक्कल केलं'. गावातील लोकांनीच या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती.
सध्या पोलिसांनी बबलूला ताब्यात घेतलं आहे. त्याला त्याने केलेल्या कृत्यासाठी १४ वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान बांग्लादेश महिला परिषदेत ५९२ बलात्काराच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. या घटना २०१८ च्या सुरूवातीच्या सहा महिन्यातील आहेत. महिलांवरील वाढत्या अत्याचारांमुळे बांग्लादेश नेहमीच चर्चेत राहतो.