शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

धक्कादायक! नोकरीवरून काढून टाकल्याचा राग, संतापलेल्या कार क्लीनरने सूड घेण्यासाठी फेकलं अ‍ॅसिड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 10:40 IST

कामावरून कर्मचारी आणि कार मालक यांच्यात वाद झाला होता.

Shocking News: उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये नुकतीच एक अशी घटना घडली जी ऐकून तुम्हाला धक्का बसेल. सेक्टर 75 मध्ये असलेल्या एका सोसायटीमध्ये एका कार क्लीनरने त्याचे काम नीट केले नाही, त्यामुळे साफसफाई करणाऱ्या त्या कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. या गोष्टीचा त्या कार क्लीनरला इतका राग आला की नोकरी गेल्याच्या सूडापोटी नाराज झालेल्या कार क्लीनरने चक्क अ‍ॅसिड फेकल्याची घटना घडली. ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे.

नक्की काय घडले?

सेक्टर-75 मध्ये असलेल्या सोसायटीमध्ये साफसफाईच्या कामावरून कर्मचारी आणि कार मालक यांच्यात वाद झाला. त्याच्या कामावर समाधानी नसल्याने कार मालकरांनी त्याला त्या कामावारून हटवले. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 15 गाड्यांवर अ‍ॅसिड फेकल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी सर्व कार मालकांनी सेक्टर-113 पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सेक्टर-75 च्या मॅक्सब्लिस व्हाईटहाऊस सोसायटीचे AOA अध्यक्ष संजय पंडित म्हणाले की, रामराज 2016 पासून सोसायटीमध्ये कार साफ करत आहेत. आठवडाभरापूर्वी काही लोकांनी त्याला कामावरून काढून टाकले. सोसायटीतील इतर वाहनांची साफसफाई करण्याचे काम तो करत होता.

बुधवारी सकाळी सुरक्षा कर्मचार्‍यांनी रामराजला तळघर पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या सुमारे 15 कारवर अ‍ॅसिड ओतताना पाहिले. या घटनेनंतर रामराज घटनास्थळावरून पळू लागला, मात्र गेटवर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले. AOA अध्यक्ष म्हणाले की, घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. 15 गाड्यांच्या मालकांनी तक्रार दाखल करून रामराजला पोलिसांच्या ताब्यात दिले. अ‍ॅसिडमुळे सोसायटीतील 15 हून अधिक गाड्यांचे नुकसान झाले आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांचे म्हणणे काय?

सेक्टर-113 स्टेशन प्रभारी जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, रामराज हा हरदोईचा रहिवासी आहे आणि होशियारपूर गावात भाड्याच्या घरात राहतो. चौकशीत त्याने पोलिसांना कोणीतरी अ‍ॅसिड फेकल्याचे सांगत आरोप नामंजूर असल्याचे सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 427 (दुर्घटना) अंतर्गत या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली आहे.

टॅग्स :carकारUttar Pradeshउत्तर प्रदेश