दिवसाला ४० सिगारेट ओढणारा दोन वर्षांचा 'चेन स्मोकर'; आई-बापानेही केलेत हात वर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 16:04 IST2018-08-24T15:56:05+5:302018-08-24T16:04:11+5:30
आता तर लहान मुलांमध्येही ही सवय वाढताना दिसते आहे. याचं एक ताजं आणि धक्कादायक उदाहरण इंडोनेशियातील सांगता येईल.

दिवसाला ४० सिगारेट ओढणारा दोन वर्षांचा 'चेन स्मोकर'; आई-बापानेही केलेत हात वर
सिगारेट ओढणे आरोग्यासाठी किती हानिकारक आहे हे काही वेगळं सांगायला नको. कॅन्सर या जीवघेण्या आजाराची ही पहिली पायरी आहे. इतकेच नाही तर सिगारेट ओढणाऱ्यांच्या आजूबाजूच्या लोकांनाही याचा धोका होतो. अनेकदा इशारा देऊनही धुराचा हा जीवघेणा खेळ सुरुच आहे. आता तर लहान मुलांमध्येही ही सवय वाढताना दिसते आहे. याचं एक ताजं आणि धक्कादायक उदाहरण इंडोनेशियातील सांगता येईल.
एका दिवसात ओढतो ४० सिगारेट
इंडोनेशियामध्ये चक्का एका २ वर्षाच्या मुलाला सिगारेटची सवय लागली आहे. रापी पामुंगास असे या मुलाचे नाव असून हा दिवसातून तब्बल ४० सिगारेटी ओढतो अशी माहिती आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मुलाचे आई-वडीलही त्याला असे करण्यापासून रोखण्याबाबत उदासीन आहेत.
डेली मेलने दिलेल्या एका वृत्तानुसार, रापीला सिगारेट ओढण्याची सवय २ महिन्यांपूर्वी लागली. आता त्याची स्थिती अशी झाली आहे की, रस्त्याने चालता चालता तो कुणालाही सिगारेट मागतो. त्याच्या या धक्कादायक सवयीमुळे तो सध्या सुकाबुमी परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात तो लागोपाठ सिगारेट ओढताना दिसत आहे. त्याला अडवल्यास तो चिडतो.
आई देते मुलाला सिगारेटचे दोन पाकिटं
यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मुलाच्या आईने सांगितली. ती म्हणजे ती स्वत: मुलाला सिगारेटचे पाकिट देते. तीने सांगितले की, 'मला हे माहीत आहे की, हे त्याच्यासाठी घातक आहे. पण मी निष्प्रभ आहे. मी स्वत: त्याला सिगारेटचे दोन पाकिटं आणून देते. असे न केल्यास तो ओरडायला लागतो. रात्री झोपू शकत नाही आणि रडत असतो. रस्त्याने जाणाऱ्या लोकांना तो सिगारेट मागतो'.
कशी लागली त्याला ही सवय?
या मुलाच्या आईने पुढे सांगितले की, 'रापी हा २ महिन्यांपासून सिगारेट ओढायला लागला. रापीची आई रस्त्याच्या कडेला एक छोटं दुकान चालवते. रापी नेहमी इथे असतो. जेव्हा लोक सिगारेट ओढून त्या फेकत असे ते रापी पुन्हा पेटवून ओढू लागला. हळूहळू त्याला याची सवय लागली.
टीकेनंतर डॉक्टरांकडे जाणार
सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रापीच्या आई-वडिलांवर खूप टिका झाली. त्यानंतर त्यांनी त्याला डॉक्टरकडे घेऊन जाणार असल्याचं सांगितलं. इंडोनेशिया हा जगातल्या त्या देशांमध्ये आहे जिथे सर्वात जास्त प्रमाणात सिगारेट ओढल्या जातात.