470 वर्ष जुना रहस्यमय किल्ला ज्यात आहेत शेकडो भुयार, बाहेरून अजिबात दिसत नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 14:19 IST2022-10-12T14:12:42+5:302022-10-12T14:19:40+5:30
Shergar fort Bihar : अफगाण शासक शेरशाह सूरीच्या या किल्ल्यात शेकडो भुयारी रस्ते आणि तळघरे आहेत. हे भुयारी रस्ते कुठे उघडतात हे आजपर्यंत कुणालाच माहीत नाही.

470 वर्ष जुना रहस्यमय किल्ला ज्यात आहेत शेकडो भुयार, बाहेरून अजिबात दिसत नाही
Shergar fort Bihar : जगभरात असे अनेक किल्ले आहेत ज्यांचं रहस्य आजही रहस्य बनूनच आहे. असाच एक किल्ला बिहारमधील रोहतास जिल्ह्यात आहे. शेरगढ किल्ला असं या किल्ल्याला नाव देण्यात आलं आहे. अफगाण शासक शेरशाह सूरीच्या या किल्ल्यात शेकडो भुयारी रस्ते आणि तळघरे आहेत. हे भुयारी रस्ते कुठे उघडतात हे आजपर्यंत कुणालाच माहीत नाही.
कैमूरच्या डोंगरांवर असलेल्या या किल्ल्याची बनावट इतर किल्ल्यांपेक्षा फार वेगळी आहे. हा किल्ला असा तयार केली की, बाहेरून कुणी बघितला तर दिसणार नाही. किल्ल्याच्या तीन बाजूने घनदाट जंगल तर एक बाजूने दुर्गावती नदी आहे.
किल्ल्याच्या आत जाण्यासाठी एका भुयारातून जावं लागतं. असे म्हणतात की, जर ही भुयारे बंद केली तर किल्ला कुणाला दिसणारही नाही. येथील तळघरांबाबत बोललं जातं की, हे इतके मोठे आहेत की, यात एकत्र १० हजार लोकही येऊ शकतात.
असे म्हणतात की, हा किल्ला शेरशाह सूरीने दुश्मनांपासून वाचण्यासाठी तयार केला होता. तो त्याच्या परिवारासोबत आणि सैनिकांसोबत इथेच राहतं होता. इथे त्यांच्यासाठी सुरक्षेपासून ते वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा होत्या.
तसेच कोणत्याही दिशेने जर दुश्मन येत असतील आणि १० किलोमीटर दूरही असतील तर ते दिसतील अशी या किल्ल्याची बनावट आहे. असे म्हटले जाते की, याच किल्ल्यात शेरशाह सूरी, त्याचा परिवार आणि हजारो सैनिकांची मुघलांनी हत्या केली होती.
असे सांगितले जाते की, हा किल्ला १५४० ते १५४५ दरम्यान तयार करण्यात आला आहे. इथे शेकडो भुयार कारण म्हणजे अडचणीच्या वेळी सुरक्षित बाहेर पडता यावं. असे म्हणतात की, हे भुयार कुठे उघडतात हे केवळ शेरशाह सूरी आणि त्याच्या खास सैनिकांनाच माहीत होतं. या किल्ल्यातील एक भुयार रोहतास गढ किल्ल्यापर्यंत जाते, पण भुयार पुढे कुठपर्यंत आहे हे कुणालाच माहीत नाही.
असे म्हणतात की, या किल्ल्यात शेरशाहचा मोठा खजिनाही लपवलेला आहे. पण आजपर्यंत हा खजिना सापडलेला नाही. या किल्ल्यातील भुयारांचं आणि तळघरांचं जाळं असं पसरलेलं आहे की, लोक आत जाण्यासही घाबरतात.