पार्कमध्ये खेळता खेळता मालामाल झाला 7 वर्षाचा मुलगा, सापडली अशी वस्तू बघून सगळे अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 10:27 AM2024-03-30T10:27:58+5:302024-03-30T10:28:10+5:30

रिले बेटरिज आपल्या घरापासून जवळच असलेल्या पार्कमध्ये खेळण्यासाठी गेला होता. तेव्हाच त्याला एक चमकदार दगड सापडला.

Seven year old boy found sapphire worth 8 lakhs during walking in the park | पार्कमध्ये खेळता खेळता मालामाल झाला 7 वर्षाचा मुलगा, सापडली अशी वस्तू बघून सगळे अवाक्...

पार्कमध्ये खेळता खेळता मालामाल झाला 7 वर्षाचा मुलगा, सापडली अशी वस्तू बघून सगळे अवाक्...

कधी कुणाचं नशीब कसं बदलेल काही सांगता येत नाही. एका मिनिटात तुम्ही श्रीमंत होऊ शकता तर त्याच मिनिटात तुम्ही रस्त्यावरही येऊ शकता. एका सात वर्षाच्या मुलासोबत असंच काहीसं झालं. नेहमीप्रमाणे तो सकाळी पार्कमध्ये फिरायला गेला. तिथे त्याला एक अशी वस्तू सापडली ज्यामुळे तो मालामाल झाला. 

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, क्वींसलॅंडचा राहणारा रिले बेटरिज आपल्या घरापासून जवळच असलेल्या पार्कमध्ये खेळण्यासाठी गेला होता. तेव्हाच त्याला एक चमकदार दगड सापडला. त्याला वाटलं तो एखादा मोती असेल. तो दगड घेऊन घरी आला. जेव्हा हा दगड सोनाराला दाखवला तर समजलं की, हा दगड 14.5 कॅरेटचा नीलम रत्न आहे. बाजारात याची किंमत 10 हजार डॉलर म्हणजे साधारण 8.83 लाख रूपये आहे. टिकटॉकवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओ रिले त्याच्या शाळेच्या कपड्यांमध्ये दिसत आहे. तो वडिलाना तो दगड दाखवण्यासाठी उत्सुक आहे. 

मॅट म्हणाला की, माझा मुलगा 3 वर्षाचा असल्यापासून नीलमणिचा शोध घेत आहे. त्यावेळी त्याने माझ्या खांद्यावर बसून नीलम शोधला होता. पण आता त्याला सगळ्यात महागडा रत्न सापडला आहे. 

तो म्हणाला की, याआधी एका मुलीला येथील मातीत नीलम सापडला होता. ज्याची किंमत 2 हजार डॉलर होती. हिऱ्यांचे एक्सपर्ट पीटरसन म्हणाले की, रिलेकडे जो नीलम सापडला आहे तो फार अद्भुत आहे. त्यात काहीच आंतरिक फ्रॅक्चर नाही. याची किंमत 10 हजार डॉलरपेक्षा जास्त असू शकते. जर याला व्यवस्थित तयार केला तर खूप सारे पैसे मिळतील. हा व्हिडीओ टिकटॉकवर 1 मिलियन वेळ बघण्यात आला. लोक यावर कमेंट करून रिलेचं अभिनंदन करत आहेत.

Web Title: Seven year old boy found sapphire worth 8 lakhs during walking in the park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.