अचानक कारमध्ये शिरला चित्ता, काहीजण घाबरले; या पठ्ठ्याने चक्क सेल्फी घेतली, पहा Video...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 14:30 IST2022-09-23T14:21:08+5:302022-09-23T14:30:31+5:30
Selfie with Cheetah: चित्त्यासोबत सेल्फी घेणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.

अचानक कारमध्ये शिरला चित्ता, काहीजण घाबरले; या पठ्ठ्याने चक्क सेल्फी घेतली, पहा Video...
Selfie with Cheetah: अनेकांना सेल्फी घेण्या मोह असतो, सोशल मीडियावर सेल्फी अपलोड करुन, व्हायरल होण्याची त्यांची इच्छा असते. व्हायरल होण्यासाठी काहीजण कोणत्याही थराला जायला तयार असतात. असाच एक प्रकार समोर आला आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चक्क चित्त्यासोबत(Cheeta) सेल्फी घेताना दिसत आहे.
या फोटोमागचे सविस्तर माहिती अशी की, काहीजण जंगल सफारीसाठी गेले होते. यावेळी त्यांना एक चित्ता दिसला, ते सर्व चित्ता पाहण्यासाठी थांबले. अचानक चित्ता त्यांच्या जवळ आला आणि उडी मारुन गाडीवर बसला. यावेळी त्यांच्या गाडीचे विंडशिल्डही खुले होते.
यावेळी गाडीतील काहीजण घाबरात, पण एक व्यक्ती चक्क त्या चित्त्यासोबत सेल्फी घेतो. विशेष म्हणजे, यावेळी तो चित्ताही त्या व्यक्तीला काही करत नाही.
African Selfie…Cheetah style pic.twitter.com/WnOHkB5J9D
— Clement Ben IFS (@ben_ifs) September 21, 2022
व्हायरल व्हडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चित्ता अचानक गाडीवर येतो आणि सन रुफजवळ येऊन आरमात बसतो. यावेळी गाडीतील व्यक्ती सेल्फी घेतो. यावेळी गाडीत असलेल्या एका व्यक्तीने हा सर्व प्रकार आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. हा व्हिडिओ आयएफएस अधिकारी क्लीमेंट बेन यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. यासोबत African Selfie, Cheetah style, असे कॅप्शनही दिले. व्हिडिओला आतापर्यंत 73 हजारांपेक्षा जास्त व्हू मिळाले आहेत, तर 3 हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केला आहे.