नवरीचा हा साज बघुन तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी, पाणीपुरीच्या वेडापायी चढवला पुरीचा मुकुट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 21:29 IST2021-07-08T21:26:18+5:302021-07-08T21:29:44+5:30
लग्न हा असा सोहळा असतो जो प्रत्येकाच्या आयुष्यात आठवणीत राहणारा समारंभ असतो. तो समारंभ आणखी शानदार करण्यासाठी लोक अनेक गोष्टी करतात. भरपूर खर्च करून जंगी सोहळा आयोजित करतात. पण काही अवलिया असे असतात जे लग्नातच कलाकारी दाखवतात.

नवरीचा हा साज बघुन तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी, पाणीपुरीच्या वेडापायी चढवला पुरीचा मुकुट
लग्न हा असा सोहळा असतो जो प्रत्येकाच्या आयुष्यात आठवणीत राहणारा समारंभ असतो. तो समारंभ आणखी शानदार करण्यासाठी लोक अनेक गोष्टी करतात. भरपूर खर्च करून जंगी सोहळा आयोजित करतात. पण काही अवलिया असे असतात जे लग्नातच कलाकारी दाखवतात.
तुम्ही पाणीपुरीचे चाहते असालच. या लॉकडाऊनमध्ये तुम्ही सर्वात जास्त कोणती गोष्ट मिस करत असाल ती म्हणजे पाणीपूरी. या पाणीपुरीच्या प्रेमापायी एका मुलीने चक्क लग्नात पाणीपुरीचा मुकुट आणि पाणीपुरीची माळ घातली. तुम्हाला एकुन धक्काच बसला ना! तिचा हा खास पाणीपुरी साज बघुन नेटकऱ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. आर्थीबालाजी मेकओव्हर स्टाईल्स या इनस्टाग्राम युजरने हा फोटो शेअर केला आहे. याला आतापर्यंत १ लाखाच्या वर लाईक्स मिळाले आहेत.