काय सांगता! तरूणीला मिळाली पॉर्न व्हिडीओ बघण्याची अनोखी नोकरी, जाणून घ्या काय असेल तिचं काम...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 12:29 IST2022-06-21T12:28:26+5:302022-06-21T12:29:18+5:30

Porn Research Head: 22 वर्षीय या तरूणीला पॉर्न व्हिडीओवर रिसर्च करायचा आहे. यामागे उद्देश हा आहे की, कंपनी चांगले आयडियाज पाहून चांगले पॉर्न व्हिडीओ तयार करतील.

Scotland girl is earning money after watching porn videos, Know her sallary | काय सांगता! तरूणीला मिळाली पॉर्न व्हिडीओ बघण्याची अनोखी नोकरी, जाणून घ्या काय असेल तिचं काम...

काय सांगता! तरूणीला मिळाली पॉर्न व्हिडीओ बघण्याची अनोखी नोकरी, जाणून घ्या काय असेल तिचं काम...

Porn Research Head: अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, जगातील जास्तीत जास्त लोकांना त्यांची नोकरी बोरिंग वाटते. लोक त्यांच्या नोकरीमुळे वैतागलेले असतात. पण पैशांसाठी काम करतात. याचं कारण मनासारखं काम नसणे किंवा ऑफिसमध्ये जास्त दबाव असणे. पण स्कॉटलॅंडच्या एका 22 वर्षीय तरूणीला अशी नोकरी मिळाली ज्यात तिला केवळ पॉर्न व्हिडीओ बघायचे आहेत. बरं यासाठी तिला पैसेही चांगले मिळणार आहेत.

22 वर्षीय या तरूणीला पॉर्न व्हिडीओवर रिसर्च करायचा आहे. यामागे उद्देश हा आहे की, कंपनी चांगले आयडियाज पाहून चांगले पॉर्न व्हिडीओ तयार करतील. या कामासाठी तरूणीला प्रत्येक तासासाठी 1,500 रूपये मिळणार आहेत. ही नोकरी पॉर्न साइट बेड-बायबिलने दिली आहे.

90 हजार लोकांमधून तरूणीची निवड

न्यूयॉर्क पोस्टमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, बेड-बायबिलमध्ये पॉर्न रिसर्च हेडच्या पोस्टसाठी 90 हजारापेंक्षा जास्त लोकांनी अर्ज केला होता. जगभरातून आलेल्या हजारो अर्जांमध्ये 22 वर्षीय रेबेका डिक्सन हिचंही नाव होतं. या कठिण स्पर्धेत  रेबेकाने हजारो लोकांना मागे टाकत ही नोकरी मिळवली.

रेबेका सध्या बेड-बायबिलवर सर्वात जास्त बघितल्या गेलेल्या 100 व्हिडीओजवर रिसर्च करत आहे. रेबेकाने न्यूयॉर्क पोस्टला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, पॉर्न रिसर्च हेडची नोकरी जगातली सर्वात चांगली नोकरी आहे. ती म्हणाली की, ही एक वेगळ्या प्रकारची नोकरी आहे. याच्या वेगळ्या आव्हानांसाठीही मी तयार आहे. मी खुल्या विचारांची मुलगी आहे. मला काही नवीन करण्यात काहीच अडचण नाही.

काय आहे तिचं काम?

पॉर्न रिसर्च हेड म्हणून रेबेकाला बारकाईने पॉर्न व्हिडीओ बघायचे आहेत. त्या व्हिडीओतील आवाज आणि त्यातील काम करणाऱ्या महिला-पुरूषांची संख्याही तिला काढायची आहे. सोबतच त्यातील प्रयोगांची माहितीही तिला गोळा करायची आहे. यावर तिला एक रिपोर्ट लिहायचा आहे.

Web Title: Scotland girl is earning money after watching porn videos, Know her sallary