पार्टनरला दगा दिल्यानंतर पेंग्विनचं ब्रेकअप आणि घटस्फोट, समोर आला आश्चर्यकारक रिपोर्ट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 13:06 IST2025-01-22T13:05:35+5:302025-01-22T13:06:09+5:30
रिसर्चमधून समोर आलं की, पेंग्विनमध्ये घटस्फोटाच्या घटना वाढण्याचं कारण त्यांच्या कॉलनीमध्ये वाढत असलेला प्रजनन दर मानला गेला आहे.

पार्टनरला दगा दिल्यानंतर पेंग्विनचं ब्रेकअप आणि घटस्फोट, समोर आला आश्चर्यकारक रिपोर्ट!
Penguin Love Life Exposed: प्रेम, भांडण, ब्रेकअप, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आणि मग घटस्फोट या सगळ्या गोष्टी मनुष्यांसोबत होत असतात. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, पेंग्विनच्या समुहांमध्येही या सगळ्या गोष्टी होतात. एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला की, पेंग्विनच्या कम्युनिटीमध्ये कपल एकमेकांना दगा देणं आणि इतरांसोबत संभोग केल्यानंतर त्यांच्यात घटस्फोट वाढत आहेत. रिसर्चमधून समोर आलं की, पेंग्विनमध्ये घटस्फोटाच्या घटना वाढण्याचं कारण त्यांच्या कॉलनीमध्ये वाढत असलेला प्रजनन दर मानला गेला आहे.
साधारण १० वर्ष चाललेल्या या रिसर्चमध्ये वैज्ञानिकांना आढळलं की, फिलिप बेटावर १३ प्रजनन सीझनमध्ये रिसर्च करण्यात आलेल्या ३७ हजार छोट्या पेंग्विनच्या कॉलनीमध्ये 'घटस्फोट' कॉमन होते. पेंग्विन वेगळे होण्याचं कारण निराशाजनक संभोग हे कारण आढळून आलं. पण दगा देणाऱ्या मादा पेंग्विनला याचा फटका बसला. ब्रीडिंग सीझननंतर मादा पेंग्विन नव्या पार्टनरच्या शोधात निघाली आणि आपली इच्छा पूर्ण केली. इकॉलॉजी अॅन्ड इवोल्यूशन जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, रिसर्चचे सह-लेखक रिचर्ड रीना म्हणाले की, 'चांगल्या काळात पेंग्विन जास्तकरून आपल्या पार्टनरसोबत राहतात आणि त्यांच्यात थोडी भांडणंही होत असतात. अशात नव्या ब्रीडिंग सीझनमध्ये त्यांनी नव्या पार्टनरला शोध घेतला.
२५० घटस्फोट
दहा वर्ष केलेल्या रिसर्चमध्ये आढळून आलं की, जवळपास १ हजार जोडप्यांपैकी २५० पेंग्विनचे घटस्फोट झाले. तर इतर मादा पेंग्विन विधवा राहिल्या. तर अनेक पेंग्विनचं पार्टनरसोबत ब्रेकअप झालं आणि त्यांच्या प्रजनन दर कमी झाला. ज्यावरून हे दिसून येतं की, ग्रुप सोडणं यशस्वी ठरलं नाही. वाढत्या घटस्फोटामुळे पेंग्विनला हाय-क्वालिटी पार्टनर नक्की मिळाले, पण यात त्यांचा वेळ अधिक गेला आणि प्रजनन दर कमी झाला.
होऊ शकते 'ही' समस्या
रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की, ही समस्या आई-वडिलांना जेवण कमी मिळत असेल तर आपल्या पिल्लांसाठी जेवण शोधण्यासाठी भाग पाडू शकते. कारण नवा जोडीदार शोधण्यात वेळ जास्त जात असल्यानं प्रजनन सुरू होण्यात उशीर होतो. तेच दुसरीकडे नवीन जोडपं घरटं बनवणं, अंड्यांना उब देणं आणि पिल्लांचं पालन पोषण करण्यात एक्सपर्ट नाहीत. तेच अनुभवी पेंग्विन कपलला या गोष्टी करण्यात वेळ लागत नाही.