गायीच्या दुधापेक्षाही पौष्टिक असतं झुरळाचं दूध? वैज्ञानिकांचा आश्चर्यकारक दावा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 12:43 IST2025-03-08T12:41:54+5:302025-03-08T12:43:54+5:30

Viral News: तुम्हाला विश्वास बसणार झुरळाचं दूध गायीच्या दुधापेक्षाही जास्त पौष्टिक असतं. असा दावा आमचा नाही तर वैज्ञानिकांनी केला आहे.

Scientists claims cockroach milk is more nutritious than cow milk | गायीच्या दुधापेक्षाही पौष्टिक असतं झुरळाचं दूध? वैज्ञानिकांचा आश्चर्यकारक दावा...

गायीच्या दुधापेक्षाही पौष्टिक असतं झुरळाचं दूध? वैज्ञानिकांचा आश्चर्यकारक दावा...

Viral News: दुधाला एक परिपूर्ण आहार मानलं जातं. रोज दूध पिण्याचे अनेक फायदे शरीराला मिळत असतात. यातील कॅल्शिअमनं हाडं तर मजबूत होतातच, सोबतच शरीराला एनर्जी मिळते. गायीच्या दुधात खूप जास्त पोषण असल्याचं म्हटलं जातं. मात्र, तुम्हाला विश्वास बसणार झुरळाचं दूध गायीच्या दुधापेक्षाही जास्त पौष्टिक असतं. असा दावा आमचा नाही तर वैज्ञानिकांनी केला आहे. वैज्ञानिकांनी असाही दावा केला की, झुरळाचं दूध भविष्यात सुपरफूड बनू शकतं.

झुरळ कसं देतं दूध?

तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, झुरळ कसं दूध देतं? तर हे दूध कोणत्याही सामान्य झुरळातून नाही तर झुरळाच्या एका खास प्रजातीमधून मिळतं. Diploptera punctata असं या प्रजातीचं नाव आहे. खास बाब म्हणजे हे जगातील एकमेव झुरळ आहे जे पिल्लांना जन्म देतं आणि त्यांना पोषण देण्यासाठी दुधासारखा तरल पदार्थ तयार करतं. या तरल पदार्थात दुधासारखेच पोषक तत्व असतात. ज्यात प्रोटीन, फॅट आणि शुगरचा प्रमाण अधिक असतं.

गायीच्या दुधापेक्षा पौष्टिक

२०१६ मध्ये वैज्ञानिकांनी एक रिसर्च केला, ज्यात आढळलं की, या झुरळाचं दूध गायीच्या दुधापेक्षा तीन पटीनं जास्त पोषण देतं. यात अमीनो अॅसिड, प्रोटीन, कॅल्शिअम आणि शुगर असते. या दुधात म्हशीच्या दुधापेक्षाही जास्त कॅलरी असतात. म्हणजे हे दूध खूप ऊर्जा देणारं आहे.

मनुष्यांसाठी उपलब्ध आहे का?

आतापर्यंत तरी हे दूध मनुष्यांसाठी उपलब्ध झालेलं नाही. कारण याचं उत्पादन अवघड आहे. झुरळामधून दूध काढणं अवघड आणि महागडं ठरतं. एक छोटा ग्लास झुरळाचं दूध काढण्यासाठी हजारो झुरळांची गरज पडेल. वैज्ञानिक आता यावर आणखी अभ्यास करत आहेत.

जर हे दूध व्यावसायिक रूपानं तयार केलं गेलं तर भविष्यात कदाचित सुपरफूडही बनू शकतं. हे शाकाहारी आणि पर्यावरण प्रेमींसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतं. कारण हे तयार करण्यासाठी दूध उत्पादनाच्या तुलनेत कमी साधनं आणि ऊर्जा लागेल.

Web Title: Scientists claims cockroach milk is more nutritious than cow milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.