सुट्टीसाठी 'या' शिक्षकाने जे कारण दिलं, त्यापुढे सगळी कारणे फेल आहेत ना भौ!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 12:56 PM2019-11-07T12:56:19+5:302019-11-07T12:57:05+5:30

आपल्या सर्वांनीच कधीना कधी शाळेत, कॉलेज किंवा ऑफिसमधून सुट्टी घेण्यासाठी काहीना काही कारण नक्कीत सांगितलं असेल.

School teacher buys fake tuberculosis diagnosis report so that he could take long vacation | सुट्टीसाठी 'या' शिक्षकाने जे कारण दिलं, त्यापुढे सगळी कारणे फेल आहेत ना भौ!

सुट्टीसाठी 'या' शिक्षकाने जे कारण दिलं, त्यापुढे सगळी कारणे फेल आहेत ना भौ!

Next

(Image Credit : healthline.com)

आपल्या सर्वांनीच कधीना कधी शाळेत, कॉलेज किंवा ऑफिसमधून सुट्टी घेण्यासाठी काहीना काही कारण नक्कीत सांगितलं असेल. फार काही वेगळं काही कारण सांगितलं नसेल तरी ते नेहमीचं आपलं पोटदुखीचं कारण तर नक्कीच सांगितलं असेल. आता काळानुसार कारणंही बदलली आहेत. पण सुट्टी देणारे सुद्धा ही कारणे पकडण्यात माहीर झाले आहेत. पण चीनच्या एका शिक्षकाने सुट्टीसाठी फारच मोठा कारनामा केलाय.

चीनच्या एका खाजगी शाळेतील शिक्षक 'दू' ने हा कारनामा केला. असे सांगितले जाते की, या शिक्षकाने मोठी सुट्टी घेण्यासाठी स्वत:ला टीबी झाल्याचे सांगितले. इतकेत नाही तर यासाठी त्याने खोटे रिपोर्टही तयार केले. दु ला चीनच्या नॅशनल डे ला मोठी सुट्टी हवी होती. पण या सगळ्या प्रकरणाचा खुलासा झाल्यावर त्याने माफीही मागितली.

रिपोर्टसाठी किती केला खर्च

रिपोर्ट्सनुसार, आपल्या छातीचा खोटा एक्स-रे आणि डायग्नोसिस रिपोर्ट तयार करण्यासाठी त्याने ४७० युआन म्हणजेच ४८०० रूपये खर्च केले. या रिपोर्ट्समध्ये त्याला टीबी पीडित दाखवण्यात आलं आहे. दु ने हा रिपोर्ट शाळेच्या प्रशासनाला दिला आणि सुट्टी मागितली. 

शाळेतील दोन मुलं निघाले टीबीने पीडित

टीबीचं संक्रमण आणि आजार फार गंभीर आहे. त्यामुळे शाळेच्या प्रशासनाने हे ठरवलं की, ते मुलांचं मेडिकल चेकअप करतील. जेणेकरून या आजाराबाबत वेळीच माहिती मिळावी. अशात शाळेतील दोन मुलांना टीबी असल्याचं समोर आलं. ही बाब शिक्षकासाठी आश्चर्याची होती. त्यामुळे त्याने पुन्हा माहिती मिळवली आणि यावेळी खर्च करून दुसरा डायग्नोसिस रिपोर्ट तयार केला. यानुसार त्याचा टीबी बरा झाला होता.

शिक्षक फसला

शाळेतील मुलांचे आई-वडील घाबरले होते. ते दु चा नवा रिपोर्ट योग्य मानत नव्हते. त्याला तिसऱ्यांदा रिपोर्ट आणण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं. दु चं चेकअप झालं आणि त्यात आढळलं की, त्याला टीबी नव्हताच. इतकेच नाही तर डॉक्टरांनी एक्स-रे पाहून सांगितलं की, हा आधीच्या दुसऱ्या एका व्यक्तीचा आहे. 

...मग मागितली माफी

आता सगळा भांडाफोड झाल्यावर शिक्षकाने चूक कबूल केली आणि माफी मागितली. त्याने सांगितले की, त्याला जास्त सुट्टी हवी होती. त्यामुळे त्याने असं केलं. इतकेच नाही तर त्याने हेही सांगितले की, मुलांना टीबी असल्याचं आढळल्यावर तो घाबरला होता. नंतर जाऊन टीबी बरा झाल्याचा रिपोर्टही तयार केला. या घटनेची चर्चा सोशल मीडियात चांगलीच रंगली आहे.


Web Title: School teacher buys fake tuberculosis diagnosis report so that he could take long vacation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.