संतापजनक! Live Streaming साठी यूट्यूबरने घेतला प्रेग्नेंट गर्लफ्रेन्डचा जीव, कपड्यांविना बसवलं होतं थंडीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 12:03 IST2020-12-10T11:53:19+5:302020-12-10T12:03:08+5:30
रशियन यूट्यूबर स्टास रीफ्लेने लाइव्ह स्ट्रीमिंग दरम्यान त्याच्या गर्भवती गर्लफ्रेन्डला कपड्यांविना बाहेर थंडीत बसवलं होतं.

संतापजनक! Live Streaming साठी यूट्यूबरने घेतला प्रेग्नेंट गर्लफ्रेन्डचा जीव, कपड्यांविना बसवलं होतं थंडीत
जगभरात असे अनेक यूट्यूबर आहेत जे त्यांच्या व्हिडीओज व्ह्यूज वाढवण्यासाठी वाट्टेल ते करतात. रशियातील अशाच एका यूट्यूबरचा लाइव्ह स्ट्रीमिंगसाठी केलेला धक्कादायक कारनामा समोर आला आहे. ३० वर्षीय यूट्यूबर स्टास रीफ्लेने केवळ लाइफ स्ट्रीमिंगसाठी आपल्या गर्भवती गर्लफ्रेन्डसोबत फारच अमानवीय प्रकार केला. ज्यामुळे त्याच्या गर्लफ्रेन्डचा मृत्यू झाला. या रशियन यूट्यूबरला अटक करण्यात आली आहे.
रशियन यूट्यूबर स्टास रीफ्लेने लाइव्ह स्ट्रीमिंग दरम्यान त्याच्या गर्भवती गर्लफ्रेन्डला कपड्यांविना बाहेर थंडीत बसवलं होतं. मात्र, थंडी अधिक असल्याने त्याची गर्लफ्रेन्ड वेलेंटीना ग्रिगोरिवाचा हायपोथर्मियामुळे मृत्यू झाला. याहूनही जास्त संतापजनक बाब म्हणजे यूट्यूबरने कथितपणे या लाइव्ह स्ट्रीमिंगसाठी एका प्रेक्षकाकडून १३०० डॉलर घेतले.
गर्भवती वेलेंटीना १५ मिनिटे गोठवणाऱ्या कडाक्याच्या थंडीत कुडकुडत होती. पण तिच्या बॉयफ्रेन्डने काही ऐकलं नाही. त्याने इतक्या थंडीतही गर्लफ्रेन्डला बाहेर बाल्कनीत बसून ठेवलं. काही वेळाने त्याला जेव्हा समजलं की, तिचा श्वास चालत नाहीये तो तिला घरात घेऊन आला. लाइव्ह स्ट्रीमिंग सुरू असतानाच त्याने वेलेंटीनाच्या मृत्यूची बातमी दिली.
यूट्यूबरचा हा संतापजनक कारनामा व्हायरल झाला आहे. यानंतर पोलीस आणि मेडिकल स्टाफ घटनास्थळी पोहोचले. तेव्हा सुद्घा लाइव्ह स्ट्रीमिंग सुरूच होतं. डॉक्टरांनी घटनास्थळीच वेलेंटीनाला मृत घोषित केलं. यूट्यूबरला अटक करण्यात आली.
तेच यूट्यूबने या घटनेचा निंदा केली आहे. यूट्यूबकडून जारी करण्यात आलेल्या स्पष्टीकरणात ते म्हणाले की, आम्हाला या अतिशय अमानवीय घटनेबाबत जाणून घेऊन धक्का बसला. आम्हाला अशाप्रकारचा कंटेंट मान्य नाही.