गेल्या 23 वर्षांपासून नर्सने कापले नाहीत केस; आता लोक म्हणतात, 'Rapunzel'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 17:13 IST2021-10-10T17:13:41+5:302021-10-10T17:13:53+5:30
Russian woman who hasn't cut her hair for 23 YEARS : अँझेलिका बारानोवा (Anzhelika Baranova) नावाची ही 28 वर्षीय रशियन नर्स दावा करते की, तिचे केस इतके लांब झाले आहेत की ते जमिनीला स्पर्श करतात.

गेल्या 23 वर्षांपासून नर्सने कापले नाहीत केस; आता लोक म्हणतात, 'Rapunzel'
रशियातील (Russian) एका नर्सने गेल्या 23 वर्षांपासून आपले केस कापले नाहीत. हे ऐकून तुम्हाला थोडे विचित्र वाटेल पण हे पूर्णपणे सत्य आहे. रशियातील या नर्सने दोन दशकांहून अधिक काळानंतरही केस कापण्यास नकार दिला आहे आणि तिचे केस आता जवळजवळ जमिनीला स्पर्श करत आहेत.
अँझेलिका बारानोवा (Anzhelika Baranova) नावाची ही 28 वर्षीय रशियन नर्स दावा करते की, तिचे केस इतके लांब झाले आहेत की ते जमिनीला स्पर्श करतात. तसेच, आठवड्यातून फक्त दोन वेळा केस धुतले जातात आणि केस कोरडे करण्यासाठी हवेत सोडून देते, असे नर्सने सांगितले. दरम्यान, लोक आता या नर्सला रॅपन्झेल म्हणत आहेत. रॅपन्झेल ही एक जर्मन परीकथा आहे, ज्यात रॅपन्झेल नावाच्या मुलीचे असंभव रुपाने केस लांब आहेत.
नर्स म्हणाली की, या केसांमुळे मला काही वेळा अस्वस्थ वाटते. मात्र, केस पाहून मिळणारा आनंद हा इतर समस्या विसरून जाणारा आहे. तसेच, तिने रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, माझे केस लहानपणापासून सुंदर होते, त्यामुळे मी पाच वर्षांची असल्यापासून मी ते कापले नाहीत. याशिवाय, मी कधीही कोणत्याही विशिष्ट हेतूसाठी हे केस वाढवले नाहीत. या केसांची योग्यरित्या मी काळजी घेते.
दरम्यान, या लांब केसांच्या काळजीबद्दलही नर्सने सांगितले. ती म्हणाली, कंगवा फिरवण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा केस योग्य कंडिशनरने धुवून घेते, मग ते नैसर्गिकरित्या सुकू देते आणि खूप काळजीपूर्वक कंगवा फिरवते. तसेच, माझ्या चाहत्यांना वाटते की, लांब केस सुंदर दिसतात.