धक्कादायक! यूट्यूबरने दिलं होतं दारू पिण्याचं चॅलेंज, १.५ लीटर वोडका पिऊन व्यक्तीचा LIVE मृत्यू...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 13:38 IST2021-02-06T13:33:42+5:302021-02-06T13:38:41+5:30
द इंडिपेडेंटच्या रिपोर्टनुसार, दादाजी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रशियन व्यक्तीला एका यूट्यूबरने हे चॅलेंज दिलं होतं.

धक्कादायक! यूट्यूबरने दिलं होतं दारू पिण्याचं चॅलेंज, १.५ लीटर वोडका पिऊन व्यक्तीचा LIVE मृत्यू...
कोणत्याही गोष्टीची अति केली की नुकसानच होतं हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. असंच काहीसं रशियातील एका ६० वर्षीय व्यक्तीसोबत झालं आहे. एका यूट्यूबरने दारू पिण्याचं चॅलेंज दिलं होतं. यात या ६० वर्षीय व्यक्तीने १.५ लीटर वोडका प्यायली. ज्यानंतर त्याचा मृत्यू झाला.
६० वर्षीय व्यक्तीने यूट्यूब लाइव्ह स्ट्रीमिंगदरम्यान जास्तीत जास्त दारू पिण्याचं चॅलेंज स्वीकारलं होतं आणि ते चॅलेंज पूर्ण करण्यासाठी १.५ लिटर वोडका प्यायला. हा सगळा प्रकार लाइव सुरू होता. लोकांना या व्यक्तीला दारू पिताना मरताना पाहून धक्का बसला. (हे पण वाचा : दुबईमधील अजब घटना, केवळ 'हा' एक शब्द बोलल्याने ब्रिटिश महिलेला टाकलं तुरूंगात; असं काय म्हणाली ती?)
द इंडिपेडेंटच्या रिपोर्टनुसार, दादाजी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रशियन व्यक्तीला एका यूट्यूबरने हे चॅलेंज दिलं होतं. या चॅलेंजला थ्रॅश स्ट्रीम किंवा ट्रॅश स्ट्रीम नावाने ओळखलं जातं. यात एखाद्या व्यक्तीला पैशांच्या बदल्यात अपमानजनक काम किंवा स्टंट करण्याचं चॅलेंज दिलं जातं. याचं लाइव स्ट्रीमिंग केलं जातं. लाखो लोक हे ऑनलाइन बघत असतात. (हे पण वाचा : बाबो! 'या' रॅपरने कपाळावर लावला १७५ कोटी रूपयांचा हिरा, लोक म्हणाले - 'देवाने तुझं डोकं वाचवावं')
द इंडिपेंडेंटने स्थानिक मीडियाच्या हवाल्याने वृत्त दिलं की, या ६० वर्षीय रशियन व्यक्तीचं नाव यूरी दुशेकिन आहे. त्याला एका यूट्यूबरने पैशांच्या बदल्यात दारू पिण्याची किंवा गरम सॉस खाण्याचं चॅलेंज दिलं होतं. रशियन मीडियानुसार, १.५ लिटर वोडका सेवन केल्यावर ही व्यक्ती खाली पडली आणि त्याचा मृत्यू झाला. त्याचं मृत शरीर लाइव स्ट्रीमिंगमध्ये दिसत होतं. प्रेक्षक त्याला मरताना बघत होते.
रशियन अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात स्मोलेंक्स शहरमध्ये घडलेल्या या घटनेचा तपास सुरू केला आहे. दरम्यान रशियन सीनेटर एलेक्सी पुष्कोव यांनी अशा घटनांवर बंदी आणण्यासाठी कायदा तयार करण्यावर जोर दिलाय.