Russian entrepreneur Igor Rybakov and pop artist Alexei Sergiyenko have created a 7 crore glass throne | ७ कोटी रूपयांच्या नोटांपासून तयार केलं बुलेट प्रूफ सिंहासन, श्रीमंत होण्याची मिळेल प्रेरणा?
७ कोटी रूपयांच्या नोटांपासून तयार केलं बुलेट प्रूफ सिंहासन, श्रीमंत होण्याची मिळेल प्रेरणा?

गेल्या महिनाभरात राज्यातील सत्तेच्या खुर्चीसाठी काय-काय झालं हे तुम्ही पाहिलं. म्हणजे या खुर्चीमध्ये किती ताकद असते हे दिसलं. एका खुर्चीसाठी इतिहासात अनेक युद्धं झालीत आहेत. पण रशियातील एका आर्टिस्टने एक अनोखी खुर्ची तयार केली आहे. पण ही खुर्ची काही कुणी चोरू शकणार नाही किंवा मिळवू शकणार नाही. कारण ही सामान्य खुर्ची नाही. ही खुर्ची पहिली अशी खुर्ची असेल जी बुलेट प्रूफ ग्लासपासून तयार करण्यात आली असून सोबतच ही खुर्ची १ मिलियन डॉलर म्हणजे ७ कोटी रूपयांपासून तयार केली आहे. म्हणजे यात ७ कोटी रूपयांच्या नोटा आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या खुर्चीचं नाव Money throne x10 असं आहे. ही खुर्ची २.५ इंच बुलेट प्रूफ ग्लासपासून रशियातील आर्टिस्ट एलेस्की सर्गीयेंकोने इगोर रायबाकोवच्या मदतीने तयार केलीये. आता ही खुर्ची रशियाची राजधानी मेक्सिकोतील एका आर्ट गॅलरीमध्ये ठेवण्यात आलीये. जेणेकरून सर्वसामान्य लोक यावर बसून सेल्फी घेऊ शकतील.

या खुर्चीबाबत इगोरने सांगितले की, 'Money throne x10 या खुर्चीवर कुणी बसेल तर त्याची विचार करण्याची आणि जाणवण्याची क्षमता १० पटीने वाढेल. जर तुम्ही काही वाईट विचार केला तर तो १० पटीने वाढेल. त्यामुळे या खुर्चीवर बसण्याआधी सावधगिरी बाळगा'. त्याचं असं मत आहे की, या सिंहासनामुळे लोकांना श्रीमंत होण्याची प्रेरणा मिळेल.

अब्जाधीश इगोर रायबाकोव  TechnoNICOL Corporations चे को-ओनर आणि रायबाकोव फंडचे को-फाउंडर आहेत. त्यांची लोकप्रियताही खूप आहे. ते नेहमीच त्यांच्याकडे असलेला पैसा दाखवण्याची संधी शोधत असतात. सोबतच इतरांना श्रीमंत होण्यासाठी प्रोत्साहित करत असतात.

 


Web Title: Russian entrepreneur Igor Rybakov and pop artist Alexei Sergiyenko have created a 7 crore glass throne

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.