जगातील आठवं आश्चर्य होता 'हा' खजिना, अचानक सोन्यानं भरलेली पूर्ण रूमच झाली गायब!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 15:53 IST2024-12-28T15:45:51+5:302024-12-28T15:53:20+5:30
Treasure of Russia: एम्बर रूममधील खजिना इतका किंमती आणि दुर्मीळ होता की, त्याला जगातील आठवं आश्चर्य म्हटलं जात होतं.

जगातील आठवं आश्चर्य होता 'हा' खजिना, अचानक सोन्यानं भरलेली पूर्ण रूमच झाली गायब!
Treasure of Russia: जगभरात अनेक खजिने आहेत, जे शोधण्यासाठी लोक दिवसरात्र भटकत असतात. खजिना कुठे लपवला असेल यासंबंधी रहस्य जाणून घेण्यासाठी लोकांनाही खूप इंटरेस्ट असतो. बऱ्याचं लोकांचं खजिने शोधता शोधता आयुष्य संपलं, पण त्यांच्या हाती काही लागलं नाही. तर काही खजिने अचानक गायब झालेत. रशियातील असाच एक खजिना एम्बर रूमही असाच गायब झाला होता. एम्बर रूममधील खजिना इतका किंमती आणि दुर्मीळ होता की, त्याला जगातील आठवं आश्चर्य म्हटलं जात होतं.
६ टन सोन्याचा मुलामा
एम्बर रूम १७०१ मध्ये बनण्यात आली होती. याला जगातील आठवं आश्चर्य म्हटलं जात होतं. हा रशियातील सगळ्यात महागड्या कलाकृतींपैकी एक होता. हा पीटर द ग्रेटला रशिया आणि पर्शिया यांच्यात शांततेचं गिफ्ट म्हणून दिला होता. एम्बर रूम सेंट पीटर्सबर्गमध्ये कॅथरीन पॅलेसमध्ये स्थापन करण्यात आली होती. रशिया आणि जर्मनीमधील पेंटिंग्सने सजलेल्या या रूममध्ये ६ टन सोन्याचा मुलामा चढवण्यात आला होता. सोबतच यात अनेक मौल्यवान रत्नही होते.
दुसऱ्या महायुद्धा दरम्यान खजिना गायब
जर्मन नाझींनी जेव्हा दुसऱ्या महायुद्धा दरम्यान एम्बर रूममधील सोन्याचा मुलामा आणि मौल्यवान रत्न समुद्रामार्गे जेव्हा आपल्या देशात नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा खजिना समुद्रात बुडाला. पण काही इतिहासकार हे चुकीचं असल्याचं सांगतात. काही लोक म्हणतात की, हा खजिना आजही जर्मनीमध्ये कुठेतरी आहे. एकूणच एम्बर रूम गायब होण्याबाबत अनेक थेअरी समोर आल्या. पण हा खजिना ना आजपर्यंत कुणी शोधू शकलं ना तो कुठं असण्याचे पुरावे सापडले.
३ ट्रेजर हंटर्सने घालवली अनेक वर्ष
असंही सांगण्यात आलं की, १९६८ मध्ये सोव्हिएत महासचिव लियोनिद ब्रेझनेवनं कोनिग्सबर्ग महाल नष्ट करण्याचा आदेश दिला होता आणि त्यासोबतच हा खजिना नष्ट झाला. यानंतर जर्मनीच्या ड्रेसडेन सिटीमध्ये ३ ट्रेजर हंटर्स - लियोनार्ड ब्लयुम (७३), गुंटर एकार्ट (६७) आणि पीटर लोर (७१) ने अनेक वर्षापर्यंत खजिन्याचा शोधण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी हाती काहीच लागलं नाही.