शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

डोअरस्टॉप म्हणून वापरलेला 'तो' दगड होता १ लाख डॉलरचा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2018 2:29 PM

हा दगड म्हणजे एक उल्का असून त्यामध्ये ८८.५ टक्के लोह आणि ११.५ टक्के निकेल होते असे त्यांना दिसले. तसेच त्याचे वजन २२ पौंड इतके असून  त्याची किंमत १ लाख डॉलर असल्याचे लक्षात आले

मिशिगन- सलग तीस वर्षे दार आपटू नये म्हणून ठेवलेला दगड चक्क १ लाख डॉलर किमतीचा निघाला तर तुम्हाला कसे वाटेल? पण हे अगदी असंच झालंय. एका अमेरिकन नागरिकाच्या घरात डोअरस्टॉप म्हणून वापरलेला दगड साधासुधा नसून चक्क उल्का असल्याचे लक्षात आले आहे. सेंट्रल मिशिगन विद्यापिठातील मोना सिर्बेस्कू या भूगर्भशास्त्रज्ञाच्या प्राध्यापिकेने या दगडाचा अभ्यास केल्यावर त्यांना धक्काच बसला.     हा दगड म्हणजे एक उल्का असून त्यामध्ये ८८.५ टक्के लोह आणि ११.५ टक्के निकेल होते असे त्यांना दिसले. तसेच त्याचे वजन २२ पौंड इतके असून  त्याची किंमत १ लाख डॉलर असल्याचे लक्षात आले. शास्त्रीयदृष्ट्या आणि किंमतीच्या दृष्टीने इतका मौल्यवान नमूना मी आजवरच्या आयुष्यात कधीच पाहिला नव्हता, असे त्या म्हणाल्या या दगडाचे परिक्षण स्मिथसोनियन या वॉशिंग्टनमधील केंद्रामध्ये पुन्हा एकदा करण्यात आले. तेथेही याचप्रकारचे निरीक्षण नोंदवले गेले. या दगडाच्या मालकाच्या मतानुसार १९३० साली हा दगड पृथ्वीवर आला. १९८८ साली त्याने एडमोर येथे एक शेत विकत घेतले. तेथे हा दगड होता. इतरांपेक्षा वेगळा दिसणारा हा दगड त्याने डोअरस्टॉप म्हणून वापरायला घेतला. काही वर्षे फार्महाऊसमध्ये राहिल्यावर त्याने घर बदलले मात्र हा दगड नेहमीच आपल्याबरोबर ठेवला. मिशिगनमधल्या लोकांनी आपल्याकडचे उल्काखडक विकण्यासाठी काढल्यावर या माणसालाही आपल्याकडचा दगड लोकांना दाखवावा त्याचे परीक्षण करुन घ्यावे असे वाटले. सेंट्रल मिशिगन विद्यापीठाच्या माहितीनुसार स्मिथसोनियन आणि मिनरल म्युझियम हा दगड विकत घेण्याच्या बेतात असून त्यानंतर तो सर्वांना पाहाण्यासाठी ठेवण्यात येइल.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटकेEarthपृथ्वी