लोक हिला म्हणतात 'लालपरी', केसांपासून घरातील प्रत्येक वस्तू आहे लाल रंगाची!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 12:22 IST2019-10-25T12:19:08+5:302019-10-25T12:22:50+5:30

जगभरात असे अनेक लोक आहेत जे त्यांच्या शौकांसाठी प्रसिद्ध असतात. एक अशीच महिला अमेरिकेत आहे जोरिका रिबरनिक.

Red lady of Bosnia Zorica Rebernik loves red colour a lot | लोक हिला म्हणतात 'लालपरी', केसांपासून घरातील प्रत्येक वस्तू आहे लाल रंगाची!

लोक हिला म्हणतात 'लालपरी', केसांपासून घरातील प्रत्येक वस्तू आहे लाल रंगाची!

जगभरात असे अनेक लोक आहेत जे त्यांच्या शौकांसाठी प्रसिद्ध असतात. एक अशीच महिला अमेरिकेत आहे जोरिका रिबरनिक. ही महिला बोस्नियाची राहणारी आहे. या महिलेचं लाल रंगावर इतकं प्रेम आहे की, तिने तिचे केसही लाल केले. इतकेच नाही तर ती कपडेही सर्वच लाल रंगाचे वापरते. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, जोरिकाच्या घरातील प्रत्येक वस्तूही लालच आहे.

६७ वर्षीय जोरिका एक माजी शिक्षिका आहे. तिने सांगितले की, जेव्हा ती १८ वर्षांची होती, तेव्हापासून ती केवळ लाल रंगाचेच कपडे वापरते. याची तिला आवड आहे. जोरिकाला तिच्या आजूबाजूलाही सर्वच लाल रंगाच्या वस्तू बघणं पसंत करते. 

सर्वात जास्त हैराण करणारी बाब म्हणजे जोरिका एखाद्याच्या अंत्यसंस्कारालाही लाल रंगाचाच ड्रेस घालून जाते. सध्या तिच्या घरात वॉटर हीटरच एक अशी वस्तू आहे, ज्याचा रंग लाल नाही. कारण तिने हा हीटर पती जोरॉनच्या सांगण्यावरून वेगळ्या रंगाचा घेतला होता.

लाल रंगाबाबत प्रेमामुळेच बोस्नियातील लोक जोरिकाला 'रेड लेडी' नावाने ओळखतात. ती तिच्या शहरात इतकी प्रसिद्ध आहे की, लोक तिला कोणत्याही सेलिब्रिटीपेक्षा कमी समजत नाही.

जोरिका सांगते की, तिने तिच्या लग्नातही लाल रंगाचा ड्रेस घातला होता. लोकांना तिच्या लाल रंगावरील इतकं माहीत झालं आहे की, तिला वाढदिवसाला लाल रंगाचेच गिफ्ट मिळतात.


Web Title: Red lady of Bosnia Zorica Rebernik loves red colour a lot