शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

मॉलमध्ये थिएटर आणि फूड कोर्ट टॉप फ्लोरवरच का बनवतात? जाणून घ्या कारण....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 2:15 PM

मित्रांसोबत पार्टीचा मूड  बनला तर फूड कोर्टमध्ये बसून आरामात खाऊ-पिऊ शकता. आता तर लोकांची गरज लक्षात घेऊन शहरांमध्ये मॉल्सची संख्या वाढत आहे.

आता शहरातील वेगवेगळे मॉल्स लोकांच्या जीवनाच महत्वाचा भाग बनले आहे. खासकरून शहरी लोकांच्या. मॉल असं ठिकाण असतं जिथे तुम्ही सगळ्या प्रकारची शॉपिंग करण्यासोबतच सिनेमा बघू शकता. मित्रांसोबत पार्टीचा मूड  बनला तर फूड कोर्टमध्ये बसून आरामात खाऊ-पिऊ शकता. आता तर लोकांची गरज लक्षात घेऊन शहरांमध्ये मॉल्सची संख्या वाढत आहे.

तुम्हीही अनेकदा मित्रांसोबत किंवा फॅमिलीसोबत मॉल्समध्ये गेले असाल. यावेळी तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की, जास्तीत जास्त मॉल्समध्ये सिनेमाघर आणि फूड कोर्ट हे टॉप फ्लोरवरच का बनवले जातात? याचं काय कारण असेल की, फूड कोर्ट आणि सिनेमाघर मॉलच्या मधल्या किंवा खालच्या फ्लोरवर नसतात? (हे पण वाचा : हे आहे जगातील सर्वात भाग्यवान घर, कारण वाचून तुम्हालाही बसणार नाही विश्वास)

हे आहे कारण?

मॉलमध्ये एखाद्या व्यक्तीला काही खायचं किंवा प्यायचं असेल किंवा सिनेमा बघायचा असेल तर त्यांना टॉप फ्लोरवरच जावं लागतं. याचं कारण म्हणजे थिएटर आणि फूड कोर्टकडे जाणाऱ्या लोकांची नजर मधे लागणाऱ्या आउटलेट्स आणि दुकानांवर पडते. लोकांची त्यांवर नजर पडावी, त्यांनी शोरूममध्ये जावं आणि काहीतरी खरेदी करावं. हा यामागचा उद्देश असतो. ही एकप्रकारची मार्केटींग स्ट्रॅटेजी असते. जी खासकरून अशा लोकांसाठी तयार केली जाते ज्यांना शॉपिंग करण्यात फार इंटरेस्ट नसतो.

मॉलच्या टॉप फ्लोरवर पोहोचता पोहोचता लोक आउटलेट्सकडे आकर्षित होतात. यानंतर इच्छा नसूनही काहीना काही खरेदी करतात. असं बहुतांश लोकांसोबत होतं. नेहमीच आपण मॉलमध्ये जातो वेगळ्याच उद्देशाने. पण  तेथून काहीना काही खरेदी करून बाहेर पडतो. हेच मुख्य कारण आहे की, सिनेमाघर आणि फूड कोर्ट मॉलच्या टॉप फ्लोरला असतं. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके