आर्मी जवानांचे केस लहान ठेवण्याची काय आहेत कारणे? 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2018 03:15 PM2018-05-21T15:15:26+5:302018-05-21T15:16:01+5:30

लष्करी जवानांचे केस लहान असण्यामागे काही कारणे आहेत. चला जाणून घेऊयात काह आहेत ती कारणे...

Reasons why army soldiers keep short hairs | आर्मी जवानांचे केस लहान ठेवण्याची काय आहेत कारणे? 

आर्मी जवानांचे केस लहान ठेवण्याची काय आहेत कारणे? 

Next

तुम्ही पाहिलं असेल की कोणत्याही देशाच्या आर्मी जवानांचे केस फारच लहान असतात. तुमच्या मनात कधी हा प्रश्नही आला असेल की, त्यांचे केस इतके का लहान असतात. लष्करी जवानांचे केस लहान असण्यामागे काही कारणे आहेत. चला जाणून घेऊयात काह आहेत ती कारणे...

- सर्वात महत्वाचं कारण म्हणजे जर जवान कधी दुश्मनांच्या हाती सापडले गेले, जर त्यांचे केस धरून त्यांना आणखी टॉर्चर केलं जाऊ शकतं. त्यामुळेही त्यांचे केस लहान ठेवतात. 

- देशाची सुरक्षा करण्यासाठी दिवसरात्र एक करणाऱ्या जवानांचा केस सावरण्यात वेळ जाऊ नये. कारण त्यांच्याकडे केस सावरत बसण्य़ापेक्षाही अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या असतात.

- लहान केस असल्याने सर्वांना एकसमान असल्यासारखं वाटतं. त्यासोबत असे केल्य़ाने जवानांची एक शिस्तही बघायला मिळते. 

- लहान केस हे लगेच कोरडे होतात. त्यासोबतच नदी असो वा पावसातील एखादं ऑपरेशन केसांची पर्वा न करता जवान आपलं काम चोख पार पाडू शकतात. लहान केसांमुळे त्यांना कोणताही अडथळा जाणवत नाही. 

-  जवानांना वेगवेगळ्या ऑपरेशन दरम्यान हेल्मेट परिधान करावं लागतं.  केस जर लांब असतील तर ते हेल्मेट योग्यप्रकारे डोक्यावर बसणार नाही. हेही एक महत्वाचं कारण आहे. 

- लहान केस असण्याचा हाही एक फायदा होतो की, जवानांना युद्ध मैदानात वेगवेगळ्या परिस्थितीत अनेक दिवस रहावं लागतं. त्यामुळे त्यांच्या डोक्याला हवा मिळत रहावी, यासाठीही केस लहान ठेवले जातात. 

- जवानांचे केस लहान ठेवण्यामागचं आणखी एक महत्वाचं कारण आहे. केस लांब असल्यास ते बंदुकीचा नेम लावताना डोळ्यांवर येऊ शकतात. त्याने त्यांचा नेम चुकू शकतो. त्यामुळे त्यांचे केस लहान ठेवले जातात. 

Web Title: Reasons why army soldiers keep short hairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.