रात्री कुत्री जोरजोरात का रडतात? तुम्हालाही माहीत नसेल याचं कारण, आता जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 16:16 IST2024-12-12T16:16:21+5:302024-12-12T16:16:43+5:30
रात्री त्यांच्या रडण्याचं खरं कारण काय असतं हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. रात्री कुत्री का रडतात याचं वैज्ञानिक कारण समोर आलं आहे.

रात्री कुत्री जोरजोरात का रडतात? तुम्हालाही माहीत नसेल याचं कारण, आता जाणून घ्या!
Dogs Cry At Night: तुम्ही झोपत असता तेव्हा अनेकदा पाहिलं असेल की, रात्री अनेकदा कुत्री जोरजोरात रडतात. त्यांच्या रडण्याने आजूबाजूच्या लोकांच्या झोपेचं खोबरं होतं. काही लोकांमध्ये अशीही अंधश्रद्धा असते की, रात्री भटकत्या आत्म्यांची सावली बघूनही कुत्री घाबरतात. तर काही लोक असं म्हणतात की, जेव्हा रात्री कुत्र्यांना कुणीच दिसत नाही त्यामुळे ते घाबरतात आणि ओरडायला लागतात. मात्र, रात्री त्यांच्या रडण्याचं खरं कारण काय असतं हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. रात्री कुत्री का रडतात याचं वैज्ञानिक कारण समोर आलं आहे.
वाढत्या वयामुळे रडतात कुत्री
वैज्ञानिकांनुसार, जर कुत्री रात्री रडत असतील तर याची वेगवेगळी कारणे असू शकतात. यातील एक कारण म्हणजे त्यांचं वय वाढणं. अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, कमी वयाची कुत्री रात्री रडत नाहीत. वय वाढल्याने कुत्र्यांच्या शरीरात आधीसारखी स्फूर्ती राहत नाही आणि हाडंही कमजोरी होऊ लागतात. त्यामुळे त्यांना वेदना होतात. याच कारणाने त्यांच्या तोंडातून रडण्याचा येतो.
जखम झाल्याने रात्री रडतात कुत्री
प्राणी तज्ज्ञांनुसार, कुणीही अनोळखी आणि शक्तीशाली कुत्रा किंवा इतर प्राणी त्यांच्या एरियामध्ये शिरतात तेव्हा कुत्री घाबरतात आणि रडू लागतात. कुत्री रडून त्यांच्या एरियातील इतर कुत्र्यांना सुचित करतात. त्याशिवाय कुत्र्यांना जखम झाली किंवा तब्येत बिघडली असेल तर ते रात्री रडतात.
रस्ता भरकटल्यावरही रडतात
प्राणी तज्ज्ञांनुसार, जेव्हा कुत्रे रस्ता भरकटतात किंवा रात्रीच्या वेळी आपल्या एरियामध्ये पोहोचू शकत नाहीत तेव्हाही ते रडतात. रस्ता विसरल्यावर किंवा आपल्या ओळखीचे कुणी दिसत नसल्याने जशी लहान मुले रडतात, तसेच कुत्रेही रडतात. जेणेकरून त्या एरियातील कुत्र्याने त्याच्यावर हल्ला करू नये. त्याशिवाय थंडीच्या दिवसातही रात्री कुत्री रडतात. कारण त्यांना थंडी वाजते आणि ते थंडी घालवण्यासाठी ओरडतात.