शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

आईला कानोकान खबर न लागू देता तरूणीने डझनभर पुरूषांसोबत केलं लग्न, असा झाला भांडाफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 12:17 IST

नेहाच्या आईला आपल्या मुलीच्या या कारनाम्याबाबत कानोकान खबर नव्हती. नेहा वेगवेगळी कारणे करून घरातून निघून जात होती आणि लग्न करत होती.

कोणत्याही व्यक्तीसाठी लग्न ही आयुष्यातील मोठी गोष्ट असते. अनेकजण लग्नाबाबत वेगवेगळी स्वप्ने रंगवत असतात. सुखी संसार कसा व्हावा यांचं प्लॅनिंग करत असतात. जबाबदाऱ्या वाटून घेतात. लग्न हा आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा असतो. सामान्यपणे एकदाच आणि व्यक्तीशी लग्न केलं जातं.  पण राजस्थानच्या (Rajasthan) चित्तोडगढ (Chittorgarh) येथे राहणाऱ्या एका तरूणीने डझनभर पुरूषांसोबत लग्न केलं (Bride Married To Dozens Of Grooms) आणि पळून गेली. पोलिसांना अजूनही तिने केलेल्या लग्नांची नेमकी आकडेवारी माहीत नाही. 

दैनिक भास्करमध्ये प्रकाशित एका वृत्तानुसार, डझनभर पुरूषांसोबत लग्न करणाऱ्या या तरूणीचं नाव नेहा आहे. पोलिसांनी सांगितलं की, नेहा आणि तिचे साथीदार सीमा शेख व लक्ष्मी यांना अटक करण्यात आली असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. (हे पण वाचा : सूनेसोबत पळून जाऊन सासऱ्याने केलं लग्न, दोन वर्षाच्या बाळाला घेऊन घरी परतले आणि...)

कसा झाला भांडाफोड? 

लग्नाच्या नावावर दगा देणाऱ्या या गॅंगचा भांडाफोड तेव्हा झाला जेव्हा नेहाने स्वत: तिच्या आईसोबत पोलीस स्टेशनमध्ये पोहोचून सीमा शेख, साबिर खान आणि लक्ष्मीची तक्रार केली. तिच्यानुसार त्यांनी तिला किडनॅप केलं होतं. ती मोठ्या मुश्कीलीने त्यांच्या तावडीतून सुटली. पण पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी केली तेव्हा नेहाच या गॅंगची मास्टरमाइंड निघाली. सीमा शेख, साबिर खान आणि लक्ष्मी तिचे साथीदार निघाले.

आईला कानोकान खबर नव्हती

दरम्यान नेहाच्या आईला आपल्या मुलीच्या या कारनाम्याबाबत कानोकान खबर नव्हती. नेहा वेगवेगळी कारणे करून घरातून निघून जात होती आणि लग्न करत होती. त्यानंतर ती संधी मिळताच लग्न केलेल्या पुरूषांच्या घरातून पळून जात होती. नेहा आईला कधी सांगत होती की, ती मैत्रिणीच्या लग्नाला जाते तर कधी सांगत होती की, मैत्रिणींसोबत फिरायला जात आहे.

दरम्यान साधारण एक महिन्याआधी नेहाने जयरामसोबत लग्न केलं होतं. पण यावेळी नेहा नवरदेवाच्या घरात अडकली आणि एक महिन्यांपर्यंत ती तिथून पळून जाऊ शकली नाही. नंतर नेहा घरी आली तेव्हा तिला तिच्या आईने विचारलं की तू कुठे होती? तेव्हा सांगितलं की, तिला किडनॅप करण्यात आलं होतं आणि संधी मिळताच ती पळून आली. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानJara hatkeजरा हटकेmarriageलग्न