लग्न मंडपात सगळीकडे भरलं पाणीच पाणी, नवरीला कुणीतरी 'उचलून' नेलं; नवरदेव बघतच राहिला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 15:00 IST2024-07-19T14:44:34+5:302024-07-19T15:00:10+5:30
Viral Video : एक वेगळा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक अवाक् झाले आहेत. यात एका लग्न मंडपात सगळीकडे फक्त पाणीच पाणी भरल्याचं दिसत आहे.

लग्न मंडपात सगळीकडे भरलं पाणीच पाणी, नवरीला कुणीतरी 'उचलून' नेलं; नवरदेव बघतच राहिला!
Viral Video : सोशल मीडियावर लग्नातील वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी लग्नातील मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात तर कधी लग्नातील भांडणांचे व्हिडीओ व्हायरल होतात. असाच एक वेगळा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक अवाक् झाले आहेत. यात एका लग्न मंडपात सगळीकडे फक्त पाणीच पाणी भरल्याचं दिसत आहे.
व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, सगळीकडे पावसाचं पाणीच पाणी साचलं आहे आणि नवरदेव स्टेजवर एकटाच उभा आहे. लग्न मंडपात पाणी इतकं भरलं आहे जणू तिथे पूर आला असेल. अशात पाहुण्यांचीही चांगलीच पंचाईत झाली आहे.
व्हिडीओच्या सुरूवातीला दाखवण्यात आलं आहे की, नवरदेव मंडपातील स्टेजवर एकटाच उभा आहे. तर एक व्यक्ती नवरीला पाण्यातून उचलून घेऊन जाताना दिसत आहे. यावर सोशल मीडिया यूजर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.
भले ही बाढ़ क्यों ना आ जाए पर भोज नहीं छूटना चाहिए, ये जज़्बा कायम रहे 😜😍 pic.twitter.com/Mr5r48L5Dq
— छपरा जिला 🇮🇳 (@ChapraZila) July 10, 2024
लोक म्हणाले की, हे लग्न लोकांसाठी यादगार ठरणार आहे. तर काही लोकांनी त्यांची खिल्लीही उडवली आहे. अनेकांनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत.
हा व्हिडीओ @ChapraZila नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. असा दावा करण्यात आला आहे की, व्हिडीओ बीसलपूरच्या शिव रामेश्वरममधील आहे. सोबतच कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "पूर का येईना पण जेवण नाही सुटलं पाहिजे". काही सेकंदाच्या या व्हिडीओला पाच लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत आणि भरपूर लाइक्सही मिळाले आहेत.