रेल्वेच्या इंजिनात का नसतं टॉयलेट? मग कसं मॅनेज करतात लोको पायलट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 13:22 IST2025-12-23T13:19:57+5:302025-12-23T13:22:43+5:30
Railway Interesting Facts: अख्ख्या रेल्वेत इतके टॉयलेट असतात, पण इंजिनात का नसतं? याचंच कारण आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी आपण हेही जाणून घेणार आहोत की, रेल्वेमध्ये दोन इंजिन का असतात.

रेल्वेच्या इंजिनात का नसतं टॉयलेट? मग कसं मॅनेज करतात लोको पायलट?
Railway Interesting Facts: भारतीय रेल्वेमध्ये रोज नवनवीन आधुनिक बदल केले जात आहे. रेल्वेचं जाळं अधिक वाढत चाललं आहे. प्रवाशांसाठी अधिक सोयी सुविधा दिल्या जात आहेत. पण रेल्वेच्या लोको पायलटांना एका मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो. आपल्याला माहीत नसेल, पण लोको पायलट जोपर्यंत रेल्वेच्या इंजिनमध्ये असतात त्यांना वॉशरूमला जाता येत नाही. कारण रेल्वेच्या इंजिनात टॉयलेट नसतं. अख्ख्या रेल्वेत इतके टॉयलेट असतात, पण इंजिनात का नसतं? याचंच कारण आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी आपण हेही जाणून घेणार आहोत की, रेल्वेमध्ये दोन इंजिन का असतात.
रेल्वेत दोन इंजिन का असतात?
आपल्याला कदाचित माहीत नसेल, पण दोन इंजिन असलेल्या रेल्वेला मल्टीपल यूनिट ऑपरेशन म्हटलं जातं. रेल्वेत जास्त वजन ओढण्याची क्षमता असावी यासाठी दोन इंजिन लावलेले असतात. मालगाड्या, कोळसा, सीमेंट, तेल आणि जड कंटेनर वाहून नेणाऱ्या रेल्वेमध्ये १ इंजिन पुरेसं नसतं. त्यामुळेच दोन इंजिनांचं वापर केला जातो. लांब पल्ल्यांच्या सुपरफास्ट रेल्वेंमध्ये कधी कधी डबल इंजिन लावलं जातं, जेणेकरून स्पीड आणि नियंत्रण दोन्ही व्यवस्थित रहावं. दोन्ही इंजिनांचं नियंत्रण एकाच लोको पायलटकडे असतं.
रेल्वेच्या इंजिनात टॉयलेट का नसतं?
काही रिपोर्ट्सनुसार, इंजिनामध्ये लोको पायलटला बसण्यासाठी केवळ एक सीट असते. रेल्वेच्या इंजिनात टॉयलेट नसतं कारण इंजिनात जागेची कमतरता असते. इंजिन केवळ टेक्निकल उपकरणे आणि कंट्रोल पॅनलने भरलेलं असतं. तसेच सुरक्षेच्या कारणांनी सुद्धा इंजिनात टॉयलेट असणं शक्य नाही. इंजिन फारच संवेदनशील असतं आणि टॉयलेटसारखी व्यवस्था सुरक्षेसाठी धोका ठरू शकते. त्यामुळे यात केवळ आवश्यक उपकरणेच असतात.
मग कसं मॅनेज करतात लोको पायलट?
आधी हे जाणून घ्या की, भारतीय रेल्वे आता काही रेल्वेंच्या इंजिनांमध्ये छोटे पोर्टेबल किंवा वॉटर-लेस टॉयलेट लावण्याचा विचार करत आहे. जेणेकरून लोको पायलटची सोय व्हावी. पण सध्या तर लोको पायलट टॉयलेटला जाण्यासाठी पुढील स्टेशन येण्याची वाट बघत असतात. किंवा मग पोर्टेबल सुविधांचा आधार घेतात. त्यांना पुढील स्टेशनवर टॉयलेटला जाण्याचा वेळ मिळतो. स्टेशनवर लोको पायलटसाठी विशेष टॉयलेटची व्यवस्था केलेली असते.
इंजिनाच्या मागील स्टाफ लगेच रेक कोचमध्ये स्टाफसाठी शौचालय तर आहे, पण तिथपर्यंत पोहोचणं फारच अवघड आहे. त्यामुळे चालक कधी कधी रेल्वे थांबल्यानंतर झुडपांचा देखील वापर करत होते. पण यूनियनच्या लोकांनी हे अमानवीय असल्याचं म्हटलं.