रेल्वे रूळाच्या बाजूला असलेले सिल्व्हर बॉक्स डिपी नाही, एका खास कामासाठी होतो त्यांचा वापर; पाहा उद्देश...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 13:09 IST2026-04-08T13:07:30+5:302026-04-08T13:09:24+5:30

Railway Interesting Facts : रेल्वे रूळाच्या बाजूला सिल्व्हर रंगांचे काही बॉक्स दिसतात. आपल्याला कधीना कधी प्रश्न पडला असेलच की, हे बॉक्स कशासाठी असतात? याच प्रश्नाचं उत्तर आपण पाहणार आहोत.  

Railway Interesting Facts : What is the purpose of silver box next to railway track, know its work | रेल्वे रूळाच्या बाजूला असलेले सिल्व्हर बॉक्स डिपी नाही, एका खास कामासाठी होतो त्यांचा वापर; पाहा उद्देश...

रेल्वे रूळाच्या बाजूला असलेले सिल्व्हर बॉक्स डिपी नाही, एका खास कामासाठी होतो त्यांचा वापर; पाहा उद्देश...

Railway Interesting Facts : रेल्वेने प्रवास करणं हा एक फारच वेगळा अनुभव देणारा प्रवास असतो. रेल्वेने प्रवास करताना बऱ्याच लोकांना सगळ्यात जास्त आवडणारी बाब म्हणजे सुसाट धावणाऱ्या रेल्वेच्या गेटमध्ये उभे राहून बाहेरचा नजारा बघणे. गार वाऱ्यासोबत समोर येणारी नवनवीन शहरं, शेत, डोंगर, नद्या, निसर्ग अशा वेगवेगळ्या नजाऱ्यांचा आनंद गेटमधून बरेच लोक घेतात. खिडकीपेक्षा गेटमधून या गोष्टी बघणं भारीच. बाहेरचा हा सगळा नजारा बघताना आपल्याला बाहेरचे लांबच लांब रेल्वे ट्रॅकही दिसत असतील आणि त्यांच्या बाजूला लावलेले बोर्ड, सिग्नलही दिसत असतील. यांमध्ये सिल्व्हर रंगांचे काही बॉक्सही दिसतात. आपल्याला कधीना कधी प्रश्न पडला असेलच की, हे बॉक्स कशासाठी असतात? याच प्रश्नाचं उत्तर आपण पाहणार आहोत.  

रेल्वे रुळाच्या बाजूला अ‍ॅल्यूमिनिअम बॉक्स कशासाठी?

रेल्वेने प्रवास करताना आपण खिडकीतून किंवा गेटमधून पाहिलं असेल की, रेल्वे रूळाच्या बाजूला काही अ‍ॅल्यूमिनिअमचे बॉक्स दिसतात. हे बॉक्स कशासाठी असतात ते समजून घेण्याआधी एक्सल काय आहे हे समजून घेणं महत्वाचं ठरतं. एक्सल लोखंडाचा एक मजबूत शाफ्ट असतो जो रेल्वेच्या दोन चाकांना जोडतो आणि कोचचं पूर्ण वजन सुद्धा पेलतो. आता हे जाणून घेऊया की, रेल्वे रूळाच्या बाजूला अ‍ॅल्यूमिनिअम बॉक्स का असतात. तर या बॉक्सचं नाव एक्सल काउंटर बॉक्स असं असतं आणि त्यांचं काम चाकांची दिशा, वेग आणि एक्सल मोजण्याचं असतं. या सिल्व्हर बॉक्सच्या आत एक डिवाइस असतं जे ताराच्या माध्यमातून रूळासोबत आणि चाकासोबत कनेक्ट असतं. जेव्हा जेव्हा रेल्वे रूळावरून जाते तेव्हा ते रेल्वेचे एक्सल मोजतं.

एक्सल का मोजतात? 

आता आपल्याला असाही प्रश्न पडू शकतो की, सगळे एक्सल आणि कोच जोडलेले असतात. याचा रेकॉर्ड ऑफिसमध्ये असतोच, पण ते मोजावे कशासाठी लागतात? मुळात एक्सल मोजणं हे काम फार महत्वाचं असतं. दर ५ पाच किलोमीटर अंतरावर एक बॉक्स लावलेला असतो. एक्सल मोजल्यावर असं समजतं की, रूळावरून पूर्ण रेल्वे जात आहे की नाही. या डिवाइसने असं समजून येतं की, मागचा बॉक्स आणि पुढील बॉक्स दरम्यान काही दुर्घटना तर झाली नाही ना.

Web Title : रेलवे ट्रैक के किनारे लगे चांदी के बक्से: उद्देश्य हुआ उजागर!

Web Summary : रेलवे ट्रैक के पास चांदी के बक्से ट्रेन के एक्सल की गिनती करते हैं, जिससे सुरक्षित मार्ग सुनिश्चित होता है। ये 'एक्सल काउंटर बॉक्स' संभावित दुर्घटनाओं का पता लगाने के लिए महत्वपूर्ण हैं।

Web Title : Silver boxes by railway tracks: Purpose revealed!

Web Summary : Silver boxes near tracks count train axles, ensuring complete passage. These 'Axle Counter Boxes' detect potential derailments by comparing axle counts between sections, crucial for railway safety.