Railway Interesting Facts : भारतातील वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनची आपली एक खासियत असते. पण काही रेल्वेच्या काही गोष्टी अशा असतात ज्या समोर आल्यावर सहजपणे विश्वास बसत नाही. एका अशाच अनोख्या रेल्वे स्टेशनचा एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ज्यात एका व्यक्तीने असा दावा केला की, या स्टेशनवर वर्षातून केवळ दोनदा रेल्वे येते. याच कारणाने हे रेल्वे स्टेशन इतर स्टेशनपेक्षा वेगळं ठरतं. चला तर पाहुयात कुठे आहे हे अनोखं स्टेशन.
काय आहे या स्टेशनचं नाव?
एका अनोख्या रेल्वे स्टेशनची माहिती देणारा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @_northern_vlogger नावाच्या हँडलवर शेअर करण्यात आलाय. व्हिडिओत बघू शकता की, एक व्हिडीओ रेल्वेजवळ उभा राहून एक खास बाब सांगत आहे. तो सांगतोय की, "आपल्याला माहिती आहे का की, माझ्या मागे जी रेल्वे उभी आहे आणि ज्या ठिकाणी मी उभा तिथेही रेल्वे वर्षातून केवळ दोनदाच येते? होय...मी हुसैनीवाला स्टेशनबाबत सांगतोय". या व्यक्तीने सांगितलं की, हे स्टेशन पंजाबमध्ये फिरोजपूर आणि हुसैनीवाला सीमेच्या मधे आहे. हा या मार्गावरील शेवटचा टप्पा आहे आणि यापुढे कोणतीही रेल्वे जात नाही.
23 मार्चलाच ही ट्रेन का चालवली जाते?
हुसैनीवाला रेल्वे स्टेशनवर चालणारी ही विशेष रेल्वे सेवा वर्षभरात फक्त दोन दिवसच सुरू केली जाते. त्यामागे ऐतिहासिक आणि भावनिक कारण आहे. 23 मार्च हा भगत सिंह यांचा शहीद दिवस म्हणून पाळला जातो. या दिवशी हजारो लोक हुसैनीवाला येथे श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येतात. त्यामुळे प्रवाशांची मोठी गर्दी होते आणि त्यासाठी विशेष रेल्वे चालवली जाते. आणखी एका खास दिवशी ही रेल्वे चालवली जाते. तो म्हणजे13 एप्रिल रोजी वैशाखी निमित्ताने चालवली जाते. लोकांच्या श्रद्धा आणि ऐतिहासिक महत्त्वामुळे 23 मार्च (शहीद दिवस) आणि 13 एप्रिल (वैशाखी) या दिवशीच ही विशेष रेल्वे सेवा सुरू केली जाते.
Web Summary : Hussainiwala station in Punjab sees trains only on March 23rd (Martyr's Day) and April 13th (Vaisakhi). Thousands visit Hussainiwala to pay respects, necessitating the special rail service on these historically significant dates.
Web Summary : पंजाब के हुसैनीवाला स्टेशन पर साल में केवल 23 मार्च (शहीद दिवस) और 13 अप्रैल (वैसाखी) को ही ट्रेनें आती हैं। हजारों लोग श्रद्धांजलि देने हुसैनीवाला आते हैं, जिससे इन ऐतिहासिक तिथियों पर विशेष रेल सेवा की आवश्यकता होती है।