अचानक गायब झाली होती महिलेची एंगेजमेंट रिंग, कुत्र्याच्या X Ray मधून समोर आलं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 18:46 IST2022-04-29T18:44:33+5:302022-04-29T18:46:53+5:30

Jarahatke : बेडच्या बाजूच्या टेबलवर ठेवलेली अंगठी अचानक गायब झाल्याने त्यांना काही सुचलंच नाही. त्यांनी अंगठी सगळीकडे शोधली. पण ती काही दिसली नाही.

Puppy ate woman's priceless engagement diamond ring truth revealed in x ray | अचानक गायब झाली होती महिलेची एंगेजमेंट रिंग, कुत्र्याच्या X Ray मधून समोर आलं सत्य

अचानक गायब झाली होती महिलेची एंगेजमेंट रिंग, कुत्र्याच्या X Ray मधून समोर आलं सत्य

Jarahatke : घरातील वस्तू अनेकदा घरातच असतात पण आपल्याला त्या दिसत नाही आणि कधीतरी त्या अचानक समोर येतात. ३८ वर्षीय इलियाना रॅटनबरीसोबत असंच काहीसं झालं. त्यांची हिऱ्याची अंगठी अचानक गायब झाल्याने त्या चिंतेत होत्या. बेडच्या बाजूच्या टेबलवर ठेवलेली अंगठी अचानक गायब झाल्याने त्यांना काही सुचलंच नाही. त्यांनी अंगठी सगळीकडे शोधली. पण ती काही दिसली नाही. या अंगठीत हिरे लावलेले होते. त्यांची ही अंगठी त्यांच्या डॉगीनेच गिळली होती. 

इलियाना यांनी सकाळी झोपेतून उठल्यावर बाजूच्या टेबलवर आपली एंगेजमेंट रिंग काढून थोड्या वेळासाठी रूमच्या बाहेर गेली होती. पण जेव्हा त्या परतल्या तेव्हा अंगठी तिथे नव्हती. तिथे त्यांचा डॉगीही खेळत होता. जोपर्यंत त्या रूममधून बाहेर होत्या त्या वेळात डॉगीने खूप मस्ती केली. काही वेळाने त्यांचा संशय डॉगीवरच आला. ज्यानंतर त्या डॉगीला घेऊन डॉक्टरकडे गेल्या आणि एका एक्स-रे मुळे सगळं काही समोर  आलं.

लॅब्राडोर स्टीवी प्रजातीच्या त्यांच्या डॉगीने अंगठी गिळली होती. जी त्याच्या पोटात जाऊन अडकली होती. सुदैवाने अंगठीमुळे त्याच्या आताील अवयवांना काही नुकसान झालं नाही. डॉक्टरांनी चेक केलं तर त्यांना अंगठी सुरक्षित असल्याचं दिसलं. फक्त आता अंगठी डॉगी विष्ठेसोबत बाहेर येण्याची सगळे वाट बघत होते. साधारण चार दिवसांच्या प्रतिक्षेनंतर  अंगठी त्याच्या विष्ठेतून बाहेर आली. त्यानंतर इलियाना यांनी ती अंगठी काही दिवसा पाण्यातच ठेवली. नंतर ब्रशने घासून साफ केली. तरीही त्या ती अंगठी चेहऱ्यावर नेण्याची हिंमत करू शकत नाहीयेत.
 

Web Title: Puppy ate woman's priceless engagement diamond ring truth revealed in x ray