शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

VIDEO- इंटरनेटवर रातोरात स्टार झालेल्या प्रिया प्रकाशने फॅन्सचे हटके अंदाजात मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 1:46 PM

मित्राशी डोळ्यांच्या भाषेत बोलताना प्रिया पाहायला मिळते आहे.

मुंबई- इंटरनेटवर रातोरात स्टार बनलेल्या प्रिया प्रकाश या नवोदित अभिनेत्रीने तिच्या अंदानी सगळ्यांनाचा घायाळ केलं आहे. प्रियाच्या डोळ्यांनी व तिच्या भूवयांच्या अदाकारीने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. प्रिया प्रकाश मल्याळम सिनेमा 'ओरू अदार लव'मधील 'मलरया पूवी'मध्ये दिसते आहे. मित्राशी डोळ्यांच्या भाषेत बोलताना प्रिया पाहायला मिळते आहे. संपूर्ण गाण्यात प्रिया फक्त 30 सेकंद स्क्रीनवर दिसते. या काही सेकंदामध्ये ती तिचे डोळे उघड झाप करते तसंच भुवयाही उडवताना दिसते. डोळे व भुवयांची अदाकारी करताना तिच्या चेहऱ्यावर हास्य दिसतं आहे. प्रियाच्या या एक्स्प्रेशने सोशल मीडियावर तरूणाईला घायाळ केलं आहे. प्रियाच्या या व्हिडीओला इंटरनेटवर मिळालेला धमाकेदार प्रतिसाद पाहून प्रियाने तिच्या सगळ्या फॅन्सचे अनोख्या अंदाजात आभार मानले आहेत. प्रियाने तिच्या ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करून चाहत्यांचे आभार मानले. या व्हिडीओत प्रिया हसऱ्या चेहऱ्याने भुवया उडविताना दिसते आहे. 

मला इतकं प्रेम व पाठिंबा दिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. प्रत्येकाला रिप्लाय देणं शक्य होत नाही. पण मी तुमच्यापर्यंत पोहचण्याचा नक्की प्रयत्न करीन, तोपर्यंत तुम्ही असंच प्रेम देत राहा, असं कॅप्शन प्रियाने व्हिडीओ पोस्ट करताना दिलं आहे. 

 

फॉलोअर्सची संख्या गेली लाखोंच्या घरातइन्स्टाग्रामवर प्रियानं अनेक दिग्गजांचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. प्रिया प्रकाश वारियरला एका दिवसात तब्बल 6 लाखांहून अधिक लोकांनी फॉलो केले आहे.  यासहीत सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो होणा-या सेलिब्रिटींच्या यादीत प्रिया आता अमेरिकेची मॉडेल काइली जेनर आणि फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या दिग्गजांच्या रांगेत पोहोचली आहे.  जेनर आणि ख्रिस्तियानो या दोघांच्याही नावावर केवळ एका दिवसात इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्संची संख्या वाढल्याचा रेकॉर्ड आहे. अमेरिकीची मॉडेल काइली जेनरला एक दिवसात 8 लाखांहून अधिक तर ख्रिस्तियानो रोनाल्डोला एक दिवसात साडेसहा लाख लोकांनी इन्स्टाग्रामवर फॉलो केले आहे.  

टॅग्स :Priya Varrierप्रिया वारियरSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल